कामगार जगत
आनंदाला शोधत मार्गक्रमण करणे हेच निवृत्तीनंतरचे कार्य-…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वीइतके करूण राहिलेले नाही.त्यामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा परत साठीनंतरचे येणारे तारुण्य उपभोगू लागल्या आहेत.जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला असून आनंदाचा शोध घेत मार्गक्रमण करणे हेच निवृत्तीनंतरचे कार्य असल्याचे प्रतिपादन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.आता निवृत्त लोक क्रियाशील असतात.त्यांच्यात शारीरिक,मानसिक क्षमताही असतात.खूप जण आपली राहिलेली इच्छा आणि छंद पूर्ण करताना दिसतात.अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ,इष्ट,आप्तेष्ट,मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखावह व्हावी,एवढीच अपेक्षा असते”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघ.
कोपरगाव पंचायत समीती अंतर्गत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागामधील ज्येष्ठ लिपीक रामु हरिश्चंद्र बावीस्कर हे नुकतेच सेवानिवृत झाले असून त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी हे होते.

सदर प्रसंगी कार्याक्रमास पंचायत समितीचे उपअभियंता संतोष दळवी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रविंद्र पिसे,गटशिक्षणअधिकारी शबाना शेख,पशुसंवर्धन विभागाचे डॉ.दिलीप जामदार,महिला बालकल्याण अधिकारी पंडीत वाघेरे,कृषी अधिकारी सचिन कोष्टी,संगमनेर पंचायत समिती बांधकाम विभागचे उपअभियंता गणेश गुंजाळ,शाखा अभियंता नितीन गायकवाड,चांगदेव लाटे,राजु दिघे,अश्विन वाघ,प्रशांत वाबळे,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबन वाघमोडे व प्रशांत वाघमारे,ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जालींदर पाडेकर,राजेंद्र बागले,दिंगबर बनकर,पंचायत समिती कोपरगावचे डॉ.प्रविण आव्हाड,रामदास मिसाळ,गणेश चौधरी,रवि घारे,हेमंत परांडकर,पुजा कुमावत,दिपीका कचवे,सीमा जमदाडे,संगिता शिंगाडे,कल्पना सोनवणे,संतोष नलगे,राजेश डोंगरे,ऋषीकेष बोरुडे व राहाता पंचायत समिती अधिकारी,कर्मचारी आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा.येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते.या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य असून एकदा का आनंदाचा ठेवा सापडला,की निवृत्तीचा अर्थ उमजायला लागतो.आता निवृत्त किंवा ज्येष्ठ न म्हणता ‘यंग सिनिअर्स’ संबोधण्यात येते.त्यामुळे म्हातारणाकडे तुम्ही झुकले आहात,ही जाणीव कमी केली जाते.त्यामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा परत साठीनंतरचे येणारे तारुण्य उपभोगू लागल्या आहेत.जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.आता निवृत्त लोक क्रियाशील असतात.त्यांच्यात शारीरिक,मानसिक क्षमताही असतात.खूप जण आपली राहिलेली इच्छा आणि छंद पूर्ण करताना दिसतात.अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ,इष्ट,आप्तेष्ट,मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखावह व्हावी,एवढीच अपेक्षा असते.त्यासाठी ते ‘मॉर्निंग वॉक’ला जातात.त्यांचे ग्रुप तयार करतात.गप्पा मारतात.ज्येष्ठ नागरिक संघात जातात.त्यात होणारे विविध कार्यक्रम,स्पर्धा,सहली यांचा आस्वाद घेतात.सकस आहार घेऊन,नियमित व्यायाम करून आरोग्य सांभाळून जीवन सुखात घालविण्याचा प्रयत्न करतात.आपल्या मुलाबाळांच्या जीवनपद्धतीशी जूळवून घेतात.सेवानिवृत कर्मचारी रामू बाविस्कर यांनी आपल्या सेवेची सुरुवात कोपरगाव या ठिकाणी केली होती.त्यांनी राहाता पंचायत समितीत पाच वर्षे आपली सेवा इमाने इतबारे केली होती तर आपल्या सेवेची 26 वर्ष नुकतीच पूर्ण केली होती.त्यांनी दि.31 जानेवारी रोजी आपली सेवा पूर्ण केली असल्याचे सांगून त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे यांनी केली तर पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले तर शेवटी बावीस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे व उपस्थितांचे आभार मानले आहे.



