जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नवजात अर्भक फेकले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत विजय बाबूलाल संघवी यांच्या मालकीच्या गट क्रं.१०१/१ यामधील शौचालय बांधकामाच्या आडोशाला स्त्री जातीचे एक नवजात अर्भक अज्ञात व्यक्तीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने टाकून फरार झाल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे शिंगणापुरसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिंगणापूर येथील पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव (वय-३७) यांनीं खबर दिली होती की,विजय संघवी यांच्या मालकीच्या गट क्रं.१०२/१ मध्ये अज्ञात व्यक्तीने सहा ते सात महिन्याचे एक नवजात मृत अर्भक आपले पाप झाकण्यासाठी व स्त्री जातीचा जन्म झाला हे लपविण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीत घालून फेकून दिले आहे.त्यांनी हि खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे लक्षात आणून दिली आहे.

कोपरगाव शहरात काही वर्षांपूर्वी काले मळ्यात असेच एक नवजात अर्भक कचरा कुंडीत टाकल्याची घटना काही वर्षापुवी तेथील तत्कालीन नगरसेविका सपना मोरे व माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी उघडकीस आणली होती.त्यामुळे मोठे वादळ उठले होते.यात एक संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.त्यामुळे या दांपत्याचे नागरिकांनी कौतुक केले होते.अशीच घटना नुकतीच शिंगणापूर हद्दीत घडली आहे.तेथील पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव (वय-३७) यांना गुप्त बातमीदाराने खबर दिली होती की,विजय संघवी यांच्या मालकीच्या गट क्रं.१०२/१ मध्ये अज्ञात व्यक्तीने सहा ते सात महिन्याचे एक नवजात मृत अर्भक आपले पाप झाकण्यासाठी व स्त्री जातीचा जन्म झाला हे लपविण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीत घालून फेकून दिले आहे.त्याबाबत त्यांनी हि खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे लक्षात आणून दिली आहे.त्यांनी व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिला पोलीस पाटील सविता आढाव यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१४६/२०२३ भा.द.वि. कायदा कलम-३१८ अन्वये नुकताच नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close