कोपरगाव तालुका
दलित वस्ती अनूदान मजूर करा-…या सरपंचाची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर दलित वस्ती असताना या वित्तीय वर्षात एकही घरकुल अनुदान मंजूर झाले नाही त्यामुळे ग्रामस्थांत मोठी नाराजी आहे त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवीन आर्थिक वर्षात दलित वस्तीचे अनुदान मंजूर करावे अशी महत्वपूर्ण मागणी सुरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
ग्रामीण व शहरी भागांमधील दलित वस्त्यांसाठी १९९९ पासून प्रत्येक दलित वस्तीला ५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत होते.मात्र बांधकाम खर्चात होणारी वाढ व योजनेची उपयोगिता लक्षात घेता दलित वस्तीतील लोकसंख्येच्या निकषानुसार जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला हाेता.त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ५ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार २ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.त्यातून या महिन्यात तालुक्यात ४.१५ कोटींची ५६ कामे मंजूर करण्यात आले आहे.मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या गटाने आपल्या हितेशी ग्रामपंचायतींना त्याचा लाभ दिला असून सुरेगाव सारख्या गरजू ग्रामपंचायती वंचित ठेवल्या आहेत”-शशिकांत वाबळे,सरपंच,सुरेगाव ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.
अनुसूचित जातीच्या समाजाचे लोक समुहाने गावाच्या परिसिमेत वास्तव्य करून राहतात.या वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी-सुविधा पुरवून तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९७४ पासून दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
सदर योजनेचे नामकरण ‘दलित वस्ती सुधार योजना’ ऐवजी ‘अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे’ असे करण्यात आले आहे.ही योजना जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत राबविली जाते.
अनूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ज्यात पाणी,मलनिस्सारण,गटार बांधणे,वीज पुरवठा,जोडरस्ते,अंतर्गत रस्ते,समाजमंदिर,इत्यादी कामे करून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे हा योजनाचा मुख्य उद्देश आहे.अ.नगर जिल्ह्यात गावपातळीवर बहुतांश दलित वस्त्यांमध्ये साेयी सुविधांचा अभाव आहे.त्याला सुरेगाव ग्रामपंचायत अपवाद नाही यागावात मोठ्या प्रमाणात दलित लोकवस्ती आहे.मात्र संपत आलेल्या वित्तीय वर्षात मात्र येथील दलित वस्तीत नवीन कामे घेण्यासाठी मात्र निधीची मोठ्या प्रमाणावर वानवा जाणवत आहे.या पातळीवर वारंवार प्रस्ताव पाठवूनही उपयोग झालेला नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने या कडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी हि सरपंच शशिकांत वाबळे यांनी शेवटी केली आहे.