जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘त्या’अधिकाऱ्याचा,’रात्रीचा खेळ’ सापडला,प्रकरणाचे गांभीर्य वाढणार ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी सदर अधिकारी त्या रात्री नेमके कोठे होते याबाबत ‘न्यूजसेवा’ वर्तविलेली शक्यता रास्त ठरली असून सदर महाशय कोपरगाव शहरातील साईबाबा चौकातील हॉटेल मध्ये साधारण अकरा पासून ते पहाटे चार पर्यंत संशयास्पद रित्या आढळून आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सदर घटनेनंतर दोन दिवसात सदर तहसीलदार महाशयांनी समृद्धीच्या गाडी आणि चालकाच्या सहाय्याने बनवलेला (मूळ घटना गायब करून तयार केलेला) बनावट व्ही.डी.ओ.वापरून आपल्या समर्थनार्थ आपले महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी आणि त्यांचे हितचिंतक यांनाही कामाला लावून त्यासाठी स्वतः गायब होऊन आपला अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे.त्यामुळे खाजगी ठेकेदारांची मालमत्ता वापरून फिरणारे अधिकारी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यामुळे या प्रकरणाने तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.दरम्यान पोलीस ठाण्यात सदर महाशयांनी पोलीस अधिकाऱ्यांसह कोपरगाव तालुक्यातील ईशान्य व पश्चिम गडावरील दोन राजकिय नेत्यानांही फैलावर घेतले असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले होते.राजकीय त्यामुळे त्या रात्री सादर महाशय नेमकेकोठे होते याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्याबाबत गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या तपासाची सूत्रे हलवली होती.

दरम्यान आमच्या ‘न्यूजसेवा’ या संकेत स्थळाने सदर अधिकारी साईबाबा कॉर्नर ते येवला नाका आदी ठिकाणचे सि.सी.टी.व्ही.फुटेज तपासले तर सत्य बाहेर येऊ शकते अशी शक्यता वर्तवली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी त्याबाबतचे संशयित सि.सी.टी.व्ही.फुटेज तपासले असता त्यात साईबाबा कॉर्नर वरील एका हॉटेल मध्ये सदर महाशय साधारण दि.२४ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते दि.२५ पहाटे ०४.३० च्या दरम्यान,’रात्रीचा खेळ चालताना’ आढळून आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता या बाबत पोलिसांना सबळ पुरावे उपलब्ध होणार आहे.त्यामुळे सदर महिलेच्या विनयभंगाच्या गुन्हयात आरोप सिद्धीसाठी ते उपयुक्त ठरणार असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

दरम्यान घटनेनंतर दोन दिवसात सदर महाशयांनी आपणच समृद्धीच्या चालकाच्या सहाय्याने बनवलेला (मूळ घटना गायब करून तयार केलेला) बनावट व्ही.डी.ओ.वापरून आपल्या समर्थनार्थ आपले महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी आणि त्यांचे हितचिंतक यांनाही कामाला लावून त्यासाठी स्वतः गायब होऊन आपला अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे.त्यात त्यांना तात्पुरता जामीन जिल्हा व सत्र न्यायालयायाने मंजूर केला होता.तथापि आवश्यक अद्याप पुरावे उपलब्ध होण्यासाठी शहर पोलिसांना जास्तीचा वेळ लागू शकतो त्यामुळे त्यात जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सदर प्रकरण उपस्थित होणार असल्याचे समजत आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढत चालले असल्याचे जाणवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close