जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातून इसम गायब,पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहराचे उपनगर असलेल्या सहयाद्री कॉलनी हद्दीतील रहिवासी असलेले इसम विष्णू नानासाहेब पवार (वय-५९) हे नुकतेच आपल्या पत्नीशी झालेल्या किरकोळ वादातून आपली दुचाकी सकाळी ७ वजेच्या सुमारास कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी येथील जागेवर लावून गेले आहे.ते परत आलेच नाही त्यांच्या जवळचे नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ते मिळून आले नाही त्यामुळे खबर देणार राहुल विष्णू पवार (वय-३२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सदर गायब इसमाचा त्याचा रंग गोरा असून त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ बाहीचा शर्ट,निळ्या रंगाची फुल पॅन्ट,डोळ्यास चष्मा,चेहरा गोल,पायात काळे सॅंडल,डोक्यावर काळे-पांढरे केस,कपाळी केसरी टिळा असे वर्णन आहे.

याबाबत कोणाला वरील वर्णनाचा इसम आढळल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाणे फोन क्रं.०२४२३-२२२३३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शहर पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.५७/२०२२ येणे प्रमाणे केली आहे.

दरम्यान सदर हरवलेल्या इसमाबाबत लक्ष्मण जावळे यांनी सदर व्यक्ती पंढरपुरात सापडली असल्याचे आमच्या प्रतिनिधीस दूरध्वनीवरून कळवले होते मात्र त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने शहर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close