जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

….’त्या’ दरोड्यातील संशयीत ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर शिवारात नऊ चारी नजीक रहिवासी असलेले शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर दि.१५ सप्टेंबर च्या पहाटे १.३० च्या सुमारास ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून सोने-नाणे अशा चिज वस्तू मिळून अंदाजे २ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणात आज पहाटे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन संशयीत पढेगाव शिवारातून ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे त्यामुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

दरम्यान या गुन्ह्यात प्रत्यक्ष गेलेला माल २ लाख ८१ हजारांचा असला तरी प्रत्यक्ष सोनेच वीस तोळे गेले असल्याने हा दरोडा किमान १२ लाखांहून अधिक लुटीचा असल्याचे मानले जात आहे.मात्र फिर्यादीने घाईघाईत दिलेल्या जबाणीत चुकीची माहिती दिली असल्याने हा गोंधळ उडाला असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

     सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात चोरट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.तीन महिन्यांपूर्वी आपेगाव येथील दांपत्याची हत्या केल्यानंतर याच चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.अशीच घटना दि.१५ सप्टेंबरच्या पहाटे १.३० वाजेच्या सुमारास घडली असून सदर कुटुंब आपले नियत कर्म करून चौदा सप्टेंबरच्या रात्री झोपी गेले असताना रात्री एकच्या सुमारास त्यांना कोणीतरी आपली खिडकी वाजवत असल्याची कुणकुण लागली होती.घरमालक अनिल सोनवणे यांना जाग आल्यावर त्यांना आपल्या घराच्या खिडकीजवळ तीन-चार संशयित आढळून आले त्यांना त्यां संशयितांना याचा जाब विचारला होता.त्यावर संबंधित दरोडेखोरांना दरडावले मात्र त्यांनी त्यांना चाकू,लोखंडी गज व दांडक्याचा वापर करून धाक दाखवून घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले होते.

 चोरट्यानी शस्राचा बळावर घरात प्रवेश करून घरमालक सोनवणे यांच्याशी झटापट केली होती.त्यात घरमालक सोनवणे व त्यांची पत्नी कविता सोनवणे,भावजयी सुनीता बबन सोनवणे,आई सुगंधाबाई सोनवणे आदींना जखमी केले होते. 

दरम्यान आज आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी संबधीत कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दरोडेखोरांना सगळी लुटालूट केल्यावर उपरती झाली व त्यांनी जखमी घरमालक आणि त्यांच्या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून कोणाला किती दुखापत झाली याचा आढवा घेतल्याची माहिती समोर आली आहे.व त्यांना त्यांच्याच घरातील पाणी देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यातील काही दरोडेखोर निघून गेल्यावर या सोनवणे कुटुंबाने पुन्हा भीतीने आपला दरवाजा बंद करून घेतला असता पाणी देणारा दरोडेखोर सदस्य घरात राहिला असल्याची जाणीव घराबाहेर पडलेल्या चोरट्यांना झाली होती.त्यांनी पुन्हा काही वेळाने घटनास्थळी आपला मोर्चा वळवून घरमालक अनिल सोनवणे यांना धमकावून दरवाजा उघडण्यास भाग पाडले व आपल्या मागे राहिलेल्या सदस्यास घेऊन गेले असल्याचे समजते.


      दरम्यान संबंधित चोरटे,मराठी व तोडकी-मोडक्या हिंदीत संवाद साधत असल्याचे दिसून आले असून मराठी भाषा ही स्थानिक असल्याने व त्यानी ज्या आडवळणाच्या वाटेचा वापर केला त्यावरून ते स्थानिक असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.

दरम्यान या झटापाटी नंतर घरातील रोख ७ हजार रकमेसह २ लाख ८१ हजारांचा ऐवज लांबवला होता.त्यात ७ हजारांची रोख रक्कम त्या नंतर दोन भ्रमणध्वनी अंदाजे किंमत ७ हजार ५०० रुपये,विविध दागिने त्यात १ लाख ११ हजारांचे सोन्याचे गंठण,पाच ग्रॅम सोन्याचे बिस्कीट,पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा,दोन ग्रॅम मंगळसूत्र,१२ ग्रॅम सोन्याची चैन,वीस ग्रॅम मोहनमाळ,दोन तोळे सोन्याचे गंठण,आदी सोन्या-नाणे आदीं चीजवस्तूची बॅग चोरट्यानी पळवली होती. 

दरम्यान हि घटना कोपरगाव शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी सकाळी ३.४० च्या सुमारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यासंमवेत धाव घेतली आहे.तर तत्पूर्वी दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवर घटनास्थळी हजर झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्या नंतर सकाळी सदर ठिकाणचा पंचनामा केला आहे.त्या ठिकाणी श्वान पथकास पाचारण केले असून संशयितांना शोधण्याची मोहीम सुरु केली होती.

कोपरगाव ठाण्यात फिर्यादी कविता अनिल सोनवणे (वय-५०) रा.संवत्सर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा पूर्ण तपास केल्यानंतर उशिरा दाखल केला होता.माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची खबर देऊन श्वान पथक आणूनही आरोपींचाच छडा लावण्याचा प्रयत्न काल दिवसभर सुरू होता.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली होती.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२८७/२०२२ भा.द.वि.कलम ३९५,३९७ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा उशीरा दाखल केला होता.या घटनेने संवत्सर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान या बाबत नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून आरोपींचा शोध सुरू केला होता.त्यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून त्यांनी आज पहाटे घटनास्थळापासून तीन चार कि.मी.अंतरावर असलेल्या पढेगाव शिवारात धाड टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.त्यामुळे या गुन्हेगारांची लवकरच पोलखोल होणार असल्याचे समजते आहे.

पुढील तपास अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close