जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात सहा जणांविरुद्ध अट्रॉसिटी दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीचा पती आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना आरोपी शंकर नरहरी गावंड,गणेश शंकर गावंड आदींसह सहा जणांनी शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत असलेल्या टिळेकर यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादिच्या पतीस कुऱ्हाड,कोयता,गज,काठी व दांड्याच्या सहाय्याने शेतातील रस्त्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.१९ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना चासनळी येथील शाळेत सोडून घरी येत असताना त्यास शिर्डी-लासलगाव या रस्त्यावरील टिळेकर यांच्या दुकानासमोर आरोपी शंकर गावंड,त्यांचा मुलगा गणेश गावंड,राकेश शंकर गावंड,साहेबराव पुंजाजी सोनवणे,रविन्द्र साहेबराव सोनवणे,समाधान साहेबराव सोनवणे आदीं सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातातील गजाने,काठीने,दांड्याने,कुऱ्हाड,कोयत्याच्या सहाय्याने फिर्यादीच्या पतीस मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला शोभा नामदेव सोनवणे यांचे पती नामदेव सुधाकर सोनवणे व आरोपी शंकर गावंड व गणेश शंकर गावंड यांची जमीन शेजारी-शेजारी आहे.त्यांच्यात शेतीतील जमिनीतील रस्त्याच्या कारणावरून वाद आहेत.

दि.१९ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेचा पती नामदेव सोनवणे हा आपल्या मुलांना चासनळी येथील शाळेत सोडून घरी येत असताना त्यास शिर्डी-लासलगाव या रस्त्यावरील टिळेकर यांच्या दुकानासमोर आरोपी शंकर गावंड,त्यांचा मुलगा गणेश गावंड,राकेश शंकर गावंड,साहेबराव पुंजाजी सोनवणे,रविन्द्र साहेबराव सोनवणे,समाधान साहेबराव सोनवणे आदीं सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातातील गजाने,काठीने,दांड्याने,कुऱ्हाड,कोयत्याच्या सहाय्याने फिर्यादीच्या पतीस मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिला,तिंचा भाया सुनील सोनवणे, फिर्यादीची जाव उषा सोनवणे आदी साक्षिदार गेले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीड दिली आहे.

दरम्यान याघटनेतील फिर्यादीचा पती शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार घेत आहे.फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रं.३२२/२०२२ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,५०९,१४३,१४४,१४७,१४८,१४९,अ.जा.जमाती (अत्याचार सुधारणा कायदा-२०१५ चे ३(आय),(आर)३(आय) (एस) प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.या घटनेत फिर्यादी स्वतः,फिर्यादीचा पती,व भाया जखमी झाले आहे.आधी जखमींना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.त्यानंतर फिर्यादिस सक्षम न्यायालयात जाण्याची समज पोलिसानी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close