जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक अपघात,तरुण ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जंगली महाराज आश्रमाजवळ हिरो होंडा एच.एफ.डिलक्स या दुचाकीस (क्रं.एम.एच.२० ई. बी.७१८३) दिलेल्या धकडेत दुचाकी स्वार जानार्दन सुभाष जाधव (वय-३७) रा.पोरगाव ता.पैठण हा इसम ठार झाला आहे.याबाबत अज्ञात वाहनाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे बंधू मयत बंधू जनार्दन जाधव हे आपल्या कामासाठी दि.१६ जुलै रोजी रात्री शिर्डी या ठिकाणी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून आले होते.त्यांचे काम आटोपून ते घरी येत असताना कोकमठाण हद्दीत जंगली महाराज आश्रमाजवळ नगर-मनमाड मार्गावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने रात्री १०.३० वाजता जोराची धडक दिली होती.त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,औरंगाबाद येथील बीड बायपास रोड,जय जिजाऊ नगर तोरणा मंगल कार्यालयाजवळ रहिवासी असलेले फिर्यादी किरण सुभाष जाधव (वय-३५) यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपले मयत बंधू जनार्दन जाधव हे आपल्या कामासाठी दि.१६ जुलै रोजी रात्री शिर्डी या ठिकाणी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून आले होते.त्यांचे काम आटोपून ते घरी येत असताना कोकमठाण हद्दीत जंगली महाराज आश्रमाजवळ नगर-मनमाड मार्गावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने रात्री १०.३० वाजता जोराची धडक दिली होती.त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्याना नजीकच्या नागरिकानी वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंद क्रं.४४/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली होती.मात्र चौकशीत सदरचा अपघात लक्षात आल्यावर त्यांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा क्रं.२२०/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ),(ब) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close