जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक डिझेल चॊरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील नगरपरिषद हद्दीत एम.पी सोसायटी पेट्रोल पंपासमोर उभे वाहन आयशर-१११० टेम्पोच्या (क्रं.-एम.एच.२० डी.ई.७६५) इंधन टाकीतून रात्री अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास अज्ञातच चोरट्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी १५ हजार ७५०.५० रुपयांचे डिझेल चोरून नेले आहे.या प्रकरणी फिर्यादी आवेश ताजमहंम्मद बागवान (वय-२८) रा.आयशा कॉलनी बैल बाजार रोड यांनी कोपरगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाहन धारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी इसम आवेश बागवान यांनी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचे वाहन कोपरगाव शहरातील नगर-मनमाड रोडलगत असलेल्या एम.पी.सोसायटी येथील पेट्रोल पंपासमोर उभे करून ते झोपी गेले असता.दि.१८ जुलै रात्री ८.३० वाजे नंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने इंधन टाकीचे झाकण तोडून आपल्या आर्थिक फायद्यासाठी वरील क्रमांकाच्या वाहनातून १५ हजार ७५०.५० रुपयांचे १७० लिटर डिझेल चोरून नेले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव बैलबाजार रोड येथील आयशा कॉलनी येथील रहिवासी असलेले फिर्यादी इसम आवेश बागवान यांनी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचे वाहन कोपरगाव शहरातील नगर-मनमाड रोडलगत असलेल्या एम.पी.सोसायटी येथील पेट्रोल पंपासमोर उभे करून ते झोपी गेले असता.दि.१८ जुलै रात्री ८.३० वाजे नंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने इंधन टाकीचे झाकण तोडून आपल्या आर्थिक फायद्यासाठी वरील क्रमांकाच्या वाहनातून १५ हजार ७५०.५० रुपयांचे १७० लिटर डिझेल चोरून नेले आहे.या प्रकरणी फिर्यादी आवेश बागवान (वय-२८) रा.आयशा कॉलनी बैल बाजार रोड यांनी कोपरगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.डी.आर.पी.तिकोणे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा क्रं.२२१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close