गुन्हे विषयक
निवडणुकीच्या रणधुमाळीत गावठी कट्ट्यासह आरोपी अटक !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
ऐन निवडणुकीच्या मैदानात गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला कोपरगाव तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडलेअसून त्याच्याकडून गावठीकट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिर्डीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पथक व कोपरगाव तालुका पोलिसांनी सयुक्तरीत्या केली असून पोलिसांचे या कारवाईचे कौतुक होत आहे.

राहुल संजय शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्याच्या कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक दिलीप पगार,पो.हे.कॉ.अशोक रामा शिंदे, पो.हे.कॉ. इरफान मेहबुब शेख,पो.कॉ.३३ अमोल घनवट,पो.कॉ. रशीद शेख हे सहभागी झाले होते.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.त्यावरून वर्तमानात सोमवार दि.09 सप्टेंबर व त्या पाठोपाठ 19 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर एकमेकांविरुद्ध थेट गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली होती.त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून युत्या आणि आघाडी यांचे अनेक जण रणांगणात उतरत असून आगामी काळात सत्तेची साठमारी आणखी तीव्र होनार आहे.त्यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याची गरज आहे.या पूर्वी कोपरगाव गावठी कट्ट्याचे व गोळीबाराचे प्रकरण चांगलच गाजले होते.त्यानंतरही गुन्हेगारांवर मोठा वाचक निर्माण झाला असे मानणे धाडसाचे ठरावे.
दरम्यान या प्रकरणी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की,”सराईत गुन्हेगार राहुल संजय शिंगाडे (वय ३५, रा. सोनेवाडी,ता.कोपरगाव) हा कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार आहे.या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ पो.हे.कॉ.इरफान मेहबुब शेख व पो.हे.को.अशोक रामा शिंदे यांना माहिती देऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे पथकाची मदत घेऊन कारवाई करण्यासाठी रवाना केले होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे तपास पथक व कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे तपास पथक यांनी सापळा रचला.सायंकाळी राहुल संजय शिंगाडे हा देर्डे ते पोहेगाव जाणाऱ्या रस्त्यावर एका रेडियमच्या दुकानासमोर ग्राहकाची वाट पाहत थांबलेला असताना त्याच्यावर झडप घालून जेरबंद केले आहे.त्याची झडती घेतली असता २५ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस आढळले आहे.पोलिस पथकाने त्यास ताब्यात रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट ३/२५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद
राहुल संजय शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्याच्या कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक दिलीप पगार,पो.हे.कॉ.अशोक रामा शिंदे, पो.हे.कॉ.इरफान मेहबुब शेख,पो.कॉ.३३ अमोल घनवट,पो.कॉ.रशीद शेख हे सहभागी झाले होते.गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पगार व अंबादास वाघ हे करीत आहेत.