जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वावी नजीक ट्रक-डस्टर अपघात दोन जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास वावी नजीक आयशर ट्रक-डस्टर यांच्यात जोराचा अपघात दोन जण जखमी झाले असून त्याबाबत वावी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यातील अपघातग्रस्त कार ही कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील बाळासाहेब दहे यांची असल्याची बातमी समोर आली असून जखमी वैजापूर तालुक्यातील बोर दहिगाव येथील त्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजते.

नाशिक वरून कोपरगावकडे आपल्या ताब्यातील रेनॉल्ट कंपनीच्या डस्टर गाडीने (क्रं. एम.एच.१६ बी.ए.८९८९) येत असताना हा अपघात झाला आहे.हा अपघात पांगरी ते वावी दरम्यान वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भोकन फाट्याजवळ हा दि.१३ जून ला रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडला आहे.समोरून येणारा ट्रकने (क्रं. एम.एच.०४ एम.डी.९७८४) जोराची धडक दिली आहे.त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे कार्यकर्ते बाळासाहेब दहे यांची वरील क्रमांकाची डस्टर कार घेऊन जवळचे नातेवाईक व बोर दहिगाव येथील रहिवासी जखमी नितीन संजय उगले,(वय-२२) रा.बोर दहिगाव ता.वैजापूर,गणेश रामराव पंडित (वय-२३) हे आपल्या एका नातेवाईकास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात एका भरती करून घरी परत येत होते.

नाशिक वरून कोपरगावकडे आपल्या ताब्यातील रेनॉल्ट कंपनीच्या डस्टर गाडीने (क्रं. एम.एच.१६ बी.ए.८९८९) येत असताना हा अपघात झाला आहे.हा अपघात पांगरी ते वावी दरम्यान वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भोकन फाट्याजवळ हा दि.१३ जून ला रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडला आहे.समोरून येणारा ट्रकने (क्रं. एम.एच.०४ एम.डी.९७८४) जोराची धडक दिली आहे.त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले असून वावी पोलिसांनी या बाबत गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात दाखल केले आहे.

पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close