जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’त्या’ रुग्णावर मोफत उपचार करण्याची…या डॉक्टरांनी दाखवली तयारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

देवळा तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाची हातपायास दोरी बांधुन त्यावर तांत्रिक उपचार करण्याचा प्रयत्न झाला होता.मात्र त्या पिडीताची उपचार करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यावर आपण निशुल्क उपचार करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.ओंकार जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना दिली आहे.

दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली असून या प्रकरणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली असता सदर रुग्ण हा देवळा तालुक्यातील चिंचवे येथील असल्याचे समजले आहे.त्यावर पोलीस चौकशीत सदर तंत्र-मंत्र करणाऱ्या इसमाने मात्र गोदावरी नदीवरील स्नान करण्याचा बनाव केला होता.व पोलिसानी हिसका दाखविल्यावर उघडा पडला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त मंगळवार दि.१४ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास एका मनोरुग्णास उपचार करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक व भगत मोर्विस येथे आले असल्याची कुणकुण नजीकच्या नागरिकांना लागली होती.त्यासाठी गोदावरी नदीकाठी रहदारी पासुन दुर अंतरावर मनोरुग्णास घेऊन त्याचे नातेवाईक एकांतात एका अघोरी उपचार करणाऱ्या तांत्रिकाजवळ जमा झाले होते.गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा भयानक प्रकार समोर आला.मोर्विसचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व ग्रामस्थ गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून या गंभीर घटनेची माहिती दिली होती.

दरम्यान कृष्णा चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले.पिडीतास मानसिक आजार असल्याने त्यास अशा तांत्रिक उपचारापेक्षा मानसोपचाराची तथा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले होते.त्यानंतर गावकऱ्यांनी दुचाकीवर पिडीतास करकचून बांधलेल्या दोरातुन मुक्त केले होते.याबाबत स्थानिक पोलीसांना घटनेची माहिती दिली होती.ग्रामस्थांनी संबधित भगतावर कारवाई करण्याची मागणी केली होती.गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला असल्याने त्यांचे परीसरात कौतुक होत आहे.

दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली असून या प्रकरणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली असता सदर रुग्ण हा देवळा तालुक्यातील चिंचवे येथील असल्याचे समजले आहे.त्यावर पोलीस चौकशीत सदर तंत्र-मंत्र करणाऱ्या इसमाने मात्र गोदावरी नदीवरील स्नान करण्याचा बनाव केला होता.मात्र रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांनी मात्र या मंत्रिकानेच आम्हाला इथे आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र या प्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचेशी संपर्क केला असता त्यांनी आमच्या कार्यक्षेत्रात सदर घटना घडली नसल्याचे म्हटलं आहे.त्यामुळे याबाबत लासलगाव येथील पोलीस आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असून या प्रकरणी त्यांनी सदर रुग्णास उपचारार्थ दाखल करण्यास आणण्याची जबाबदारी घेतली असून तसा प्रयत्न करणार असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close