जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शबरीनगर येथील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी (वय-१६) अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद मुलीचा पित्याने (वय ४०) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे धारणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.अशीच घटना धारणगाव शिवारात घडली आहे.कोपरगाव तालुक्यात अशा घटनात मोठी वाढ झाली आहे.गत पाच महिन्यात निव्वळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास अशा दोनशेच्यावर घटना उघड झाल्या आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीचा पिता हा आपल्या मुलीसह धरणगाव येथील शबरी नगर परिसरात राहतो.त्यास अल्पवयीन मुलगी असून तिला दि.०५ जून रोजी सकाळी ०६ ते ०७ वाजेच्या दरम्यान अपल्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरीत मुलीच्या पित्याने दाखल केली आहे.घटनास्थळी पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०१/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगी मिळून आली असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close