जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार पोखरकर यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

अकोले -(प्रतिनिधी)


अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहीवासी व जेष्ठ पत्रकार विजय पोखरकर याच्या मातोश्री गं.भा.हौसाबाई काशीनाथ पोखरकर (वय ८६) यांचे बुधवारी १० जानेवारी च्या रात्री १० वाजता अकोले येथे उपचारादरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (११ जानेवारी) सकाळी ११ वाजता अकोले येथील अमरधाममधे अंत्यसंस्कार करण्यात आले.


   त्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापक भानुदास काशिनाथ पोखरकर,निवृत्त संगणकीय विभागप्रमुख सुभाष काशिनाथ पोखरकर,अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे दैनिक दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी विजय काशिनाथ पोखरकर,महाराष्ट्र शासनातील निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुरेश तथा बाळासाहेब काशिनाथ पोखरकर,मुंबईस्थित रिलायबल फॅसिलिटीज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सिनियर मॅनेजर रमेश काशिनाथ पोखरकर,महाराष्ट्र शासनातील अमरावती येथील जीएसटीचे सह आयुक्त संजय काशिनाथ पोखरकर यांच्या मातोश्री होत.

    त्यांच्या पश्चात वरील ६ मुले,६ सुना,१३ नातवंड,४ नातसुना,४ नातजावई व ७ पतवंड असा कुटुंबातील ४० माणसांचा मोठा परिवार आहे.

सदर अंत्यसंस्कार प्रसंगी राजकीय,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,आर्थिक, सहकारी,पत्रकारिता,शैक्षणिक व सर्व स्तरांतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close