जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बांध निश्चितीवरून दोन गटात हाणामारी,तीन जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी यांना आरोपी विष्णू गोपीनाथ वायकर याने भ्रमणध्वनी करून बोलावून घेतले व,तुला,” बांध मान्य आहे का ? असा सवाल केला असता आपण नकार दिला त्याचा राग येऊन आरोपी विष्णू गायकर,राजेंद्र सखाराम सोदक,यांच्यासह दहा अनोळखी व्यक्तींनी धक्का बुक्की करून मारहाण केली असून यात स्वतः आपण,शंतनू घोंगडे,मंगल घोंगडे आदी तीन जण जखमी झाले असल्याची फिर्याद जीभाऊ घोंगडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्याला भ्रमणध्वनी करून दि.२८ एप्रिल रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास आपल्याला बोलावून घेतले व बांधावर लावलेला पोल दाखवून आपल्याला म्हणाला की,”तुला तो मान्य आहे का? तेंव्हा आपण त्यास म्हणालो की,”तो आपल्या शेतात आला असल्याने तो आपल्याला तो मान्य नाही”त्याचा आरोपी विष्णू वायकर यास राग आला त्याने व अन्य आरोपी राजेंद्र सखाराम वायकर,यासह अन्य दहा अनोळखी आरोपी इसम यांनी आपल्याला मारहाण केली.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हा सोनेवाडी येथील रहिवासी आहे.त्यांचा व आरोपी विष्णूं गायकर यांचा शेताचा बांध शेजारी-शेजारी आहे.आरोपी हे आपल्या शेताची मोजणी करत होते.त्यांनी आपल्याला भ्रमणध्वनी करून दि.२८ एप्रिल रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास आपल्याला बोलावून घेतले व बांधावर लावलेला पोल दाखवून आपल्याला म्हणाला की,”तुला तो मान्य आहे का? तेंव्हा आपण त्यास म्हणालो की,”तो आपल्या शेतात आला असल्याने तो आपल्याला तो मान्य नाही”त्याचा आरोपी विष्णू वायकर यास राग आला त्याने व अन्य आरोपी राजेंद्र सखाराम वायकर,यासह अन्य दहा अनोळखी आरोपी इसम यांनी आपल्याला मारहाण केली.

सदर प्रसंगी आपला मुलगा शंतनू हा आपल्याला सोडविण्यास आला असता त्यांनी अनोळखी दहा आरोपीनी मारहाण केली आहे.आपली पत्नी मंगल घोंगडे हिला आरोपी राजेंद्र वायकर याने दावे हातास चावा घेवुन जखमी केले आहे.व आपल्याला शिवीगाळ,धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यात फिर्यादी स्वतः,त्याचा मूलगा शंतनू व फिर्यादीची पत्नी मंगल घोंगडे आदी तीन जण जखमी झाले आहे.

फिर्यादी जीभाऊ घोंगडे यांनी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला असून त्यानुसार कोपरगाव तालुका पोलिसांत दि.०४ मे रोजी सायंकाळी ०८.०५ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनीं या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१५७/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close