जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तळ्यात बुडून महिलेचा मृत्यू,कोपरगावात बापाचा बळी घेतल्याचा गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील आपली विवाहित मुलगी गायत्री महेश त्रिभुवन हिने आपल्या माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी तिचा शाररिक,मानसिक छळ करून तिचा आरोपी नवरा महेश दिलीप त्रिभुवन,सासरे दिलीप त्रिभुवन,तिचा भाया सुरेश त्रिभुवन,सासू मीराबाई दिलीप त्रिभुवन,जाव मोनिका सुरेश त्रिभुवन आदी पाच जणांनीं बळी घेतला असल्याचा गुन्हा राहाता तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले मयत महिलेचे पिता बाळासाहेब पंडितराव खरात (वय-४७) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

मयत मुलगी गायत्री त्रिभुवन हिने मोटार सायकल घेण्यासाठी आपल्या माहेराहून बापाकडून एक लाख रुपये आणावे यासाठी तिचा शारीरिक,मानसिक,छळ सुरु केला होता.त्यातून ती कायम मानसिक तणावात आली होती.मात्र आपली घरची परीस्थिती फारच गरिबीची असल्याने आपण आरोपी व तिच्या सासरच्या मंडळींची हि मागणी पूर्ण करू शकलो नाही असा आरोप गुन्ह्यात केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हे राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असून त्यांची मुलगी गायत्री हिचे लग्न दि.३० नोव्हेंबर २०२१ रोजी कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील मुलगा महेश दिलीप त्रिभुवन याचेशी मोठ्या थाटामाटात लावून दिले होते.सुरुवातीचा नव्यानवलाईचा काळ संपला असता तिच्या सासरच्या मंडळींनी आपले रंगढंग दाखविण्यास सुरुवात केली होती.

त्यांनी आपल्या मयत मुलगी गायत्री त्रिभुवन हिने मोटार सायकल घेण्यासाठी आपल्या माहेराहून बापाकडून एक लाख रुपये आणावे यासाठी तिचा शारीरिक,मानसिक,छळ सुरु केला होता.त्यातून ती कायम मानसिक तणावात आली होती.मात्र आपली घरची परीस्थिती फारच गरिबीची असल्याने आपण आरोपी व तिच्या सासरच्या मंडळींची हि मागणी पूर्ण करू शकलो नाही.

दरम्यान तिचा बुधवार दि.०४ मे रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास घराचे पाठीमागे असलेल्या तळ्यात तिचे शव आढळून आले आहे.तिचा नवरा महेश दिलीप त्रिभुवन,सासरे दिलीप त्रिभुवन,तिचा भाया सुरेश त्रिभुवन,सासू मीराबाई दिलीप त्रिभुवन,जाव मोनिका सुरेश त्रिभुवन आदी पाच जणांनीं बळी घेतला असल्याचा आरोप करून मयत महिलेचे वडील बाळासाहेब खरात यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५६/२०२२ भा.द.वि.कलम४९८(अ),३०४(ब),३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close