जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोवीस तासात महिलेच्या विनयभंगाची दुसरी घटना,कोपरगावात आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील महिलेचा विनयभंग घडून चोवीस तास होत नाहीत तोच सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेच्या (वय-३५) घरात येऊन आरोपी आरोपी जिगर प्रभाकर घायवट याने आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास महिलेला बांबूच्या काठीने डाव्या हातावर,पायावर मुक्का मार दिला व लाथाने अवघड जागेवर मारले व पाठीमागून मिठी मारून विनयभंग केल्याची फिर्याद बाधित महिलेने आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने सोनेवाडी परिसरासह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुरेगाव येथील रहिवासी असून ती आपल्या कुटूंबासमवेत रहाते.ती आज शनिवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजता एकटी असल्याचे पाहून आरोपी जिगर घायवट हा घरात आला व त्याने सदर महिलेला हातावर पायावर मुक्का मार दिला व लाथाने अवघड जागेवर मारले व पाठीमागून मिठी मारून विनयभंग केला आहे.व शिवीगाळ करून लाथाने मारहाण करून तीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि सुरेगाव येथील रहिवासी असून ती आपल्या कुटूंबासमवेत रहाते.ती आज शनिवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजता एकटी असल्याचे पाहून आरोपी जिगर घायवट हा घरात आला व त्याने सदर महिलेला हातावर पायावर मुक्का मार दिला व लाथाने अवघड जागेवर मारले व पाठीमागून मिठी मारून विनयभंग केला आहे.व शिवीगाळ करून लाथाने मारहाण करून तीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह सुरेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी जिगर घायवट याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी ताबडतोब हालचाल करून आरोपी जेरबंद केला आहे.विनयभंगाचा घटनात वाढ होत असल्याने तालुका पोलिसांपुढे हे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४४/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,४५२,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. सतीश भताने हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close