जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातून वाळूचोरीचा ट्रॅक्टर पळवला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ते कुंभारी शिवरस्त्याने अर्जुन रोकडे यांच्या शेताजवळून स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ७४४ ट्रॅक्टरह त्याला जोडलेल्या लाल रंगाच्या ट्रॉलीसह एक ब्रास वाळू घेऊन जात असताना तो कारवाईसाठी नेला जात असताना आरोपी चालक रामा कुंदलके (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याने तो पळवून नेला असल्याचा गुन्हा माहेगाव देशमुख येथील तलाठी भगवान शिवराम मधे (वय-३६) मूळ रा.चिंचोडी ता.अकोले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नूकताच दाखल केल्याने वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.

माहेगाव देशमुख येथील कामगार तलाठी भगवान मधे यांना त्या शिव रस्त्यावरून वाळूचोरी सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता ‘ती’ बातमी खरी निघाली होती.त्यात ठिकाणी वरील वर्णनाचा लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्याच रंगाच्या ट्रॉलीच्या सहाय्याने एक ब्रास वाळू घेऊन जात असताना त्यांनी त्यास ताब्यात घेतले होते मात्र तो मधूनच फरार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.त्यामुळे गोदावरी काठचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.याचे कोणालाही सोयरसुतक नाही.वर्तमानात नदी पात्रात पाणी कमी झाल्याने वाळूचोरांना सुगीचे दिवस आले आहे.रात्री अपरात्री हि वाळूचोरी सुरूच असते.अशीच घटना नुकतीच माहेगाव देशमुख शिवारात कुंभारी शिवारात घडली असून तेथील कामगार तलाठी भगवान मधे यांना त्या शिव रस्त्यावरून वाळूचोरी सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता ‘ती’ बातमी खरी निघाली होती.त्यात ठिकाणी वरील वर्णनाचा लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्याच रंगाच्या ट्रॉलीच्या सहाय्याने एक ब्रास वाळू घेऊन जात असताना त्यांनी त्यास ताब्यात घेतले होते.व त्याला घेऊन ते कोपरगाव येथील महसूल मुख्यालयात येत असताना ट्रॅक्टरवरील चालक रामा कुंदलके याने तो ट्रॅक्टर फरार केला आहे.या प्रकरणी कामगार तलाठी भगवान मधे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५९/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ प्रमाणे आरोपी विरुद्ध ०२ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व त्यातील एक ब्रास वाळू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close