जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अपघातात एक ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेला इसम सोमनाथ बबन बर्डे (वय-४५) याचा हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत चांदेकसारे रस्त्यावर अपघात झाला असून त्यात सदर इसम गंभीर जखमी होऊन त्यास शिर्डी येथील श्री आईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास दि.०९ फेब्रुवारी मयत घोषित केले आहे.

या प्रकरणी आधी शिर्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश निकम यांनी शिर्डी येथील पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून त्या गुन्हयाशी नोंद कोपरगाव येथील तालुका पोलीस ठाण्यात दि.११ फेब्रुवारी रोजी सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद क्रं.१२/२०२२ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close