जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाविद्यालयीन तरुणीचे अकस्मात निधन तर एक कोसळली,कोपरगावात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेली महाविद्यालयीन तरुणी समृद्धी संजय देवकर (वय-१७) हि महिला महाविद्यालयांत ती तीन वाजेच्या सुमारास आली असताना अचानक तिला त्रास होऊ लागला असता तिला नजीकच्या नागरिकांनी तिला उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुंग्णालयात भरती केले असता तिला उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.तर दुसरी चक्कर येऊन कोसळली आहे.मात्र तिला वेळेत उपचार मिळाल्याने ती सुदैवाने सावरली आहे.

दरम्यान अशीच घटना आज कोपरगाव येथील सोमैय्या महाविद्यालयातील मळेगाव थडी येथील पदवित्तोर शास्त्र विषयातील शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनीला असाच त्रास होऊन कोसळली होती.मात्र तिला वेळेत उपचार मिळाल्याने ती सावरली आहे.ती सेनेचे विदर्भातील संपर्क प्रमुखांची असल्याचे समजते.त्यांनी या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असल्याचे समजते.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या परकर्णी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१४/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

दरम्यान अशीच घटना आज कोपरगाव येथील सोमैय्या महाविद्यालयातील मळेगाव थडी येथील पदवित्तोर शास्त्र विषयातील शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनीला असाच त्रास होऊन कोसळली होती.मात्र तिला वेळेत उपचार मिळाल्याने ती सावरली आहे.ती सेनेचे विदर्भातील संपर्क प्रमुखांची असल्याचे समजते.शाळा महाविद्यालये सुरु झाली असून यातील विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण सुरु झाला आहे.त्यातून हा प्रकार उदभवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यातून शिक्षण तज्ज्ञांना व महाविद्यालयांना मधील मार्ग काढावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close