जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात ऍट्रॉसिटी,तीन जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेली फिर्यादी महिला प्रमिला संदीप मंचरे (वय-३५) हिने व तिच्या पतीने आपले सासरे कैलास उमाजी मंचरे,सावत्र दीर उमेश कैलास मंचरे,सावत्र सासू मीराबाई कैलास मंचरे यांचे विरूद्ध दोन गोण्या सोयाबीन परस्पर उचलून घेऊन जात असताना त्याला हरकत घेतल्याचा राग येऊन जातीवाचक उल्लेख करून फिर्यादीचा हात धरून कपडे फाडले केस ओढुन विनयभंग करुन अर्वाच व अश्लील भाषेत शिवीगाळ करून फिर्यादीचे पतीला मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.त्यामुळे जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

दरम्यान यातील फिर्यादी महिला प्रमिला मंचरे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांचेकडे अर्ज सादर केला होता.सदर अर्ज चौकशीत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेत फिर्यादीच्या कांद्याचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे कोपरगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि भोजडे येथील रहिवासी असून हल्ली ती राहाता येथील सदाफळ मार्केट मागे त्रिशूल नगर येथे रहाते.आरोपी कैलास उमाजी मंचरे व सावत्र दीर उमेश कैलास मंचरे,सावत्र सासू मीराबाई कैलास मंचरे हे एकाच गावातील रहिवासी व नातेवाईक आहेत.

दरम्यान फिर्यादी महिला प्रमिला मंचरे व तिचे पती हे आपल्या शेतात दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान शेत गट.क्रं.९९/१ मध्ये सोयाबीन शेतात सोयाबीन काढणी करून मळणी करत असताना आरोपी कैलास मंचरे व सावत्र दीर उमेश मंचरे,सावत्र सासू मीराबाई मंचरे आदीनीं घटनास्थळी येऊन दोन गोण्या सोयाबिन उचलून घेऊन जात असताना त्याला फिर्यादी महिला व तिच्या पतीने हरकत घेतल्याचा राग येऊन फिर्यादीला,”तू कुठून आली भटक भवाणे,सोयाबीनला हात लावायचा नाही”असे म्हणून अर्वाच शिवीगाळ करून आरोपीने फिर्यादीचा हात धरून कपडे फाडले,केस ओढले,चित्रविचित्र शिवीगाळ केली.”मला जेलमध्ये रहायची सवय आहे.माझे कोणी वाकडे करून शकत नाही”असे म्हणून फिर्यादीचे पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तंगड्या तोडण्याची धमकी दिली आहे.तसेच आरोपीनी फिर्यादीचे शेतात दि.०७ फेब्रुवारी रोजी कांद्याचे शेतात शेळ्या बकऱ्या सोडून शेतातील कांदे तुडवून टाकले.शेतातील पाईप लाईनचे आडवे तिडवे तुकडे टाकून कांदा पिकाचे नुकसान केले आहे.असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान यातील फिर्यादी महिला प्रमिला मंचरे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांचेकडे अर्ज सादर केला होता.सदर अर्ज चौकशीत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेत फिर्यादीच्या कांद्याचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे कोपरगावसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४१/२०२२ अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध ) सुधारणा कायदा २०१५ चे कलम ३(१),(डब्ल्यू)(१)(११)३(१),(आर.)(एस.)३(२),(व्ही.ए.)३(१),(जी)सह भा.द.वी.कलम-३५४,२९४,३२३,४०२७,५०४,५०६,३४ प्रमाणे.आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास नगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close