गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेची आत्महत्या,पोलिसांत नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील उपनगर नारायणपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेने रात्री कधीतरी नजीकच्या भावबंदाच्या विहिरीत आत्महत्या केली असून अशी खबर मयत महिलेचा पती सुनील सुदाम वाणी (वय-३५) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्यामुळे धामोरीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी इसम सुनील वाणी हा धामोरी येथील शेतकरी असून आपल्या पत्नी राणी वाणीसह मुलगा,मुलगी असे एकत्र राहातात.शुक्रवार दि.०४ फेब्रुवारी रोजी रात्री नियमित कामे आटोपून हे जोडपे झोपी गेले होते.दरम्यान दि.०५ फेब्रुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास या शेतकऱ्यास जाग आली असता त्याच्या शेजारी झोपलेली पत्नी राणी हि त्याला दिसली नाही.त्यावेळी घाबरून जाऊन शोध घेतला असता विहिरीत आढळून आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम सुनील वाणी हा धामोरी येथील शेतकरी असून आपल्या पत्नी राणी वाणीसह मुलगा कृष्णां,मुलगी शिवकन्या असे एकत्र राहातात.शुक्रवार दि.०४ फेब्रुवारी रोजी रात्री नियमित कामे आटोपून हे जोडपे झोपी गेले होते.दरम्यान दि.०५ फेब्रुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास या शेतकऱ्यास जाग आली असता त्याच्या शेजारी झोपलेली पत्नी राणी हि त्याला दिसली नाही.त्यावेळी घाबरून जाऊन त्याने नजीक असलेल्या आपल्या आई वडिलांना व भावाला झोपेतून उठवले.व सदर घटनेची खबर दिली.त्यामुळे त्यांनी जवळपास शोध घेऊन पाहिले असता ती मिळून आली नाही.त्या नंतर त्यांनी तिला नजीक असलेल्या खबर देणाऱ्या शेतकऱ्याच्या सख्या चुलत भावाच्या शेतातील विहिरीकडे जाऊन बॅटरीच्या साहाय्याने डोकावून पाहिले असता.त्या ठिकाणी सदर शेतकऱ्याच्या पत्नीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे.तिची साडी व अन्य वर्णन जूळल्याने ती गायब झालेली आपली पत्नीचा मृतदेह असल्याची आपली खात्री झाली होती.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे.व सदर महिलेला मृतदेह पाण्याबाहेर काढून तो उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.मयत महिलेचे शवविच्छेदन करून त्या नंतर तिचा अंत्यविधी धामोरी येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला आहे.सदर मृत्यूस काही दिवसापूर्वीचे धक्कादायक कारण असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ पाहणी करून घटनेचे गांभीर्य ओळखून या कामी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०९/२०२२ सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करित आहेत.