जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा वावर,शेतकऱ्यांत भीती!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील संवत्सर येथील अमित लोणारी यांचे वस्तीनजीक रात्री ०७.३० वाजेच्या सुमारास बिबट्याचा संचार आढळून आल्याने ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांत व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यांनी तातडीने आपली फाटके, दरवाजा बंद करून घेतला आहे.त्यामुळे अनर्थ टळला आहे.

“कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बिबट्याच्या ठशांचे अवलोकन करून कोपरगाव तालुका वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना सुरक्षा पुरवुन भीती नष्ट करावी”-विवेक परजणे,उपसरपंच,संवत्सर ग्रामपंचायत.

पूर्वी जंगलात आढळणारा बिबट्या व वाघ आता मनूष्यवस्तीत आढळू लागले आहे.साधारण ६०-७० वर्षांपूर्वी असणारी खडकाळ जमीन ही जेव्हा या भागात धरणे,कालवे बांधले तेव्हापासून सुपीक बनायला सुरुवात झाली.लांबच लांब वसलेले उसाचे फड आणि शेतीचे मळे हे लपायला जागा,पाणी आणि खायला खाद्य पुरवित असल्याने या प्राण्यांचा अधिवास बनले आहेत.बिबट्याकडून पशुधनाची हानी आणि काही वेळा शेतात काम करत असताना संध्याकाळच्या वेळी अथवा रात्री त्याचं दर्शन होणं अशा घटना सहसा घडतात.बिबट्याकडून मनुष्यहानी झाल्याच्या घटनांच्या खूप कमी नोंदीसुद्धा आहेत.माणसाला घाबरणारा असूनसुद्धा आणि माणसाला टाळण्याची प्रवृत्ती असूनसुद्धा वरील काही कारणांमुळे त्याची प्रतिमा ही नकारात्मक झाली आहे.हे बिबटे आता अकोले,राहुरी,संगमनेर आदि ठिकाणाहून आता राहाता कोपरगाव तालुक्यात सरकू लागले आहेत.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असून संवत्सर शिवारात लोणारी वस्ती येथे घडली आहे.

वर्तमानात रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून पिके काढणीला आली आहेत.त्यातच विजेचा खेळखंडोबा सुरु असून शेतकऱ्यांना आपली पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे.अशातच संकटाची मालिका सुरु झाली असून दि.०३ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास संवत्सर येथील शेतकरी अमित लोणारी यांचे वस्तीजवळ त्यांना बिबट्याने दर्शन दिल्याने त्यांची बोबडीच वळाली आहे.त्यांनी याबाबतची खबर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांना दिली असून त्यांनी वनीकरण विभागास याबाबत माहिती दिली आहे.मात्र अद्याप तालुका वनीकरण विभाग पोहचला नाही की त्यांनी त्या ठशांची तपासणी केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या भागातील बिबट्याच्या ठशांचे अवलोकन करून कोपरगाव तालुका वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close