जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या आरोपीने त्याच गावातील विविहितेचा घरात घुसून विनयभंग केला असल्याची फिर्याद महिलेने (वय-२५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात महिलांच्या विनयभंग व छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली आहे.या प्रकरणात त्याच गावातील आरोपी दि.१२ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात घुसला व त्याने फिर्यादीची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व फिर्यादीचे पतीस गचांडी देऊन हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात.सदर गुन्हा हा नैतीक अध:पतनांशी संबंधीत मानला जातो.सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे.तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे.म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत आहे.तरीही काही नराधम हा गुन्हा करण्यास धजावतात अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात महिलांच्या विनयभंग व छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली आहे.या प्रकरणात त्याच गावातील आरोपी दि.१२ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात घुसला व त्याने फिर्यादीची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व फिर्यादीचे पतीस गचांडी देऊन हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्याच गावातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसानी या प्रकरणी आरोपीस अटक केली असल्याची माहिती असून आरोपीस जामिनावर सोडले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान याघटनेला दुसरे कंगोरे असल्याचे बोलले जात आहे.त्या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५-२०२२ भा.द.वि.कलम ४५२,३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे करंजी येथील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close