जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एकाचा मृत्यू,पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील खडकी नाका रोड लगत परिसरातील ओमनगर येथे एका अज्ञात इसमाचा (वय-अंदाजे ४५-५०) मृतदेह आढळून आला आहे.त्याच्या डोक्यावरील व दाढीचे केस वाढलेले असून अंगात काळ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट व मळकट विजार असून त्याची उंची साधारण सव्वापाच फूट असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.सदर इसम बेवारस भिकारी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close