जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात तरुणांची आत्महत्या,सर्वत्र हळहळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला व शेती व्यवसायात सातत्याने तोटा येत असल्याने संतापलेल्या मनोज अरुण गाडे (वय-२९) या तरुणाने आपल्याच शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत तरुण मनोज गाडे यास अलीकडील काळात शेतीत सातत्याने तोटा येत असल्याने तो कमालीचा अस्वस्थ होता.अशी माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.आपल्या शेतातील गोठ्यातून तो का परत आला नाही हे पाहण्यासाठी लहान भाऊं रोहीत गाडे हा त्या ठिकाणी गेला असता त्याला मोठा भाऊ मनोज गाडे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असता त्याने हंबरडा फोडला.त्याचा आवाज ऐकून नजीकचे लोक त्या ठिकाणी आले असता त्यांना सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीस कि.मी.अंतरावर धामोरी ग्रामपंचायत हद्दीत मयत मनोज गाडे हा आपल्या आई,वडील,एक लहान भाऊ अशा परिवारासह रहात होता.त्याची शेती गावापासून पूर्वेस साधारण एक कि.मी.अंतरावर मांजरे वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ आहे.त्यांचा गाईचा गोठा वस्तीवर शेतात आहे.एक जण रात्रीच्या सुमारास जेवण करून झोपवयास जात.तर लहान भाऊ घरी रहात असे.मात्र आज सकाळी मोठ भाऊ म्हणाला,”तू ,गाईचे दूध घेऊन जा, मी मागून येतो” लहान भाऊ हा दूध घेऊन सकाळीच गावात आला मात्र नऊ वाजुन गेले तरी व उशीर होऊनही तो का येईना म्हणून तो सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा शेतात गेला असता हा धक्कादायक प्रकार लक्षात आला होता.

मात्र अलीकडील काळात शेतीत सातत्याने तोटा येत असल्याने तो कमालीचा अस्वस्थ होता.अशी माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.त्या ठिकाणी त्याला मोठा भाऊ मनोज गाडे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असता त्याने हंबरडा फोडला.त्याचा आवाज ऐकून नजीकचे लोक त्या ठिकाणी आले असता त्यांना सदरचा प्रकार उघडकीस आला.त्यांनी तातडीने त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०५ /२०२२ सी.आर.पी.सी.कलम १७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोठे हे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close