निधन वार्ता
अर्जुन थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी व जवळके येथील उपसरपंच विजय थोरात यांचे चुलते अर्जुन रेवजी थोरात (वय-६०) यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात,पत्नी,एक मुलगा,दोन मुली,असा परिवार आहे.
स्व.अर्जुन हे अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून आप्तस्वकीय व ग्रामस्थांत परिचित होते.त्यांनी मोठ्या कष्टातून आपल्या मुलांचे शिक्षण केले होते.त्यांच्यावर जवळके येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.