जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कंटेनरची धडक,महिला जागीच ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीत तळेगाव मळे चौफुलीजवळ तहान लागली असता महिला रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने (क्रं.एम.एच.४६ ए.एफ.७९०३) वरील चालक रंजीतशिंग जगतारसिंग मिंटू (पूर्ण पत्ता माहिती नाही) याने जोराची धडक दिल्याने त्यात वैजापूर तालुक्यातील तिडी येथील महिला शकीलाबी नूर शहा (वय-५०) हि डोक्यावरून मागील चाक गेल्याने नुकतीच जागीच ठार झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

“वैजापूर तालुक्यातील तिडी येथील रहिवासी कुटुंब असललेल्या नूर शहा रतन शहा हे आपल्या पत्नीला घेऊन कोपरगावच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे चौफुलीवर आले असता त्यांच्या पत्नी शकीलाबी शहा यांना तहान लागली असता त्यांनी आपली लुना थांबवली असता सदर महिला पाणी पिण्यासाठी पाणी शोधत असताना रस्ता ओलांडत असताना हि दुर्घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वैजापूर तालुक्यातील तिडी येथील रहिवासी कुटुंब असललेल्या नूर शहा रतन शहा हे आपल्या पत्नीला घेऊन कोपरगावच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे चौफुलीवर आले असता त्यांच्या पत्नी शकीलाबी शहा यांना तहान लागली असता त्यांनी आपली लुना थांबवली असता सदर महिला पाणी पिण्यासाठी पाणी शोधत असताना रस्ता ओलांडत होती.त्याच वेळी समोरून येणाऱ्या कंटेनरने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून सदर महिलेला जोराची धडक दिली.त्यात महिलेला धडक लागून तिच्या डोक्यावरून कंटेनरचे मागील चाक गेले त्यात तिचे जागीच निधन झालं आहे.घटनेनंतर कंटेनर चालक या घटनेची कोणतीही खबर न देता व जखमीस दवाखान्यात उपचारार्थ न नेता फरार झाला आहे.या प्रकरणी मयत महिलेच्या पतीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.४३४/२०२१ भा.द.वि.कलम ३०४,(अ)२७९,३३७,३३८,मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ),(ब)१७७,१८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close