जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एकाची आत्महत्या,की हत्या चर्चेला उधाण!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज सकाळी आठच्या सुमारास गोदावरी नदीवरील छोट्या पुलाजवळ एक पुरुष जातीचे प्रेत (वय साधारण-३५) मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव येथील रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांच्या खबरीच्या माहितीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत सापडलेल्या या मृत व्यक्ती संबंधी कोणा नागरिकास काही माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार अमित साहेबराव खोकले यांना काही नागरिकांनी आज सकाळी आठ वाजेच्या सूमारास खबर दिली की,कोपरगाव शहराच्या दक्षिणेस गोदावरी नदीवरील छोट्या पुलाजवळ माजी खा.सूर्यभान वहाडणे घाटाच्या जवळ एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यात तरंगताना दिसत असून ते पाहण्यासाठी काही नागरिकांनी गर्दी केली होती.त्या नुसार त्यानी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.त्या नुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व सहाय्यक फौजदार एस.सी.पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

सदर प्रसंगी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सोबत अन्सार शहा व प्रशांत शेलार यांना बरोबर घेऊन सदरचे अनोळखी प्रेत बाहेर काढले असून तो सडपातळ आहे.त्याचा चेहरा गोल व त्यावर दाढी वाढलेली आहे.त्याच्या अंगात अर्ध्या बाहीचा टी आकारातील लाल रंगाचा सदरा तर पायात निळ्या रंगाची ट्रॅक सूट परिधान केलेली आहे.उजव्या हातात धागा बांधलेला आहे.त्याची पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना अपयश आले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद दप्तर ०२/२०२१ सी.आर.पी.सी.अन्वये दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

या संबंधी कोणा नागरिकास काही माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close