जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात सहाय्यक फौजदाराने मागीतली लाच,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील आरोपी सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने (वय-३३) याने जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका हॉटेल मध्ये दारूचा व्यवसाय सुरळीत पुढे चालू ठेवण्यासाठी पाच हजारांची लाच मागीतल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रमेश जगधने यांनी दि.२८ जुलै रोजी दुपारी १२.३६ ते १.२१ वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दारूचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ०५ हजारांची लाच मागितली होती.त्यामुळे हा गुन्हा लाचलुचपत विभागाच्या नगर युनिटने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी यांचे पुणतांबा फाटा येथे एक हॉटेल आहे.त्या हॉटेल मध्ये त्यांना दारूचा अवैध व्यवसाय सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.व तडजोडी अंती तो ०५ हजार रुपये ठरले होते.व त्या नुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रमेश जगधने यांनी दि.२८ जुलै रोजी दुपारी १२.३६ ते १.२१ वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ०५ हजारांची लाच मागितली होती.त्यामुळे आरोपी लोकसेवक यांनी स्वतःचे फायद्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग करून स्वतःचा सांपत्तिक फायदा करून घेण्यासाठी कायदेशीर परिश्रमीका खेरीज परितोषण म्हणून लाचेची मागणी केली म्हणून त्याचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे कायदेशीर गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास दाखल झाला आहे.घटनास्थळी लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलिस निरीक्षक जयंत शीरसाठ यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३१९/२०२१ लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम सण १९८८ चे कलम ७ प्रमाणे आरोपी सहाय्यक फौजदार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलिस निरीक्षक जयंत शीरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती पुष्पा निमसे नगर युनिट या करत आहेत.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी दुजोरा दिला आहे.सदर आरोपी हा पोलीस गाडीवरील चालक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close