जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांची विद्युत पंपावर वक्रदृष्टी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गत दोन वर्षांपासून पावसाने बळीराजाला चांगली साथ दिली असली तरी त्याला एका साडेसातीचे ग्रहण लागले असून चोरट्यांची शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांवर चोरट्यांची वक्रदृष्टी झाली असून दहिगाव बोलका येथील शेतकरी सोपान मोहन काळे (वय-७२)यांच्या काळे वस्तीवरून चोरट्यानी दि.२२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ०५ हजार रुपये किमतीच्या लक्ष्मी कंपनीच्या पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपावर डल्ला मारला आहे.त्या मुळें शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या पूर्वीही कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात चोरट्यानी पोलिसांना आपली ‘हाथ की सफाई’ दाखवली आहे.त्यामुळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी पोलिसांनी या चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात पावसाने शेतकरी राजाला चांगली साथ दिली आहे.त्यामुळे आता कुठे चांगले दिवस येतील असे वाटत असताना परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते केले आहे.त्यातून उरले सुरले हाताशी येईल अशी अशा आशा निर्माण झाली असताना चोरट्यानी नुकताच कोपरगाव शहराच्या पूर्वेस साधारण बारा कि. मी.अंतरावर असलेल्या दहिगाव बोलका येथील गट क्रं.२७८/५ मधील शेतातील विहिरीत असलेल्या विद्युत पंपावर डल्ला मारला असल्याची खबर आली आहे.या घटनेत दि.२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेतकरी सोपान काळे हे आपले शेतातील काम आटोपून घरी आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी रात्री कधीतरी डल्ला मारला आहे.या प्रकरणी दुसऱ्या दिवशी ते शेतात नियमित काम करण्यास गेले असता हि चोरी लक्षात आली आहे.त्यांनी या प्रकरणी त्वरित कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनासाठी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close