जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पैशासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येथील माहेर व हनुमानवाडी पंचवटी, नाशिक येथील सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून चारचाकी गाडी घेण्यासाठी ०५ लाख रुपये आणावे या साठी आपला आरोपी नवरा कृष्णा प्रकाश खांडे,सासरा प्रकाश नानासाहेब खांडे,सासु मंदा प्रकाश खांडे,नणंद दीपाली किशोर सावंत,प्रियांका रवींद्र शिंदे,सायली गणेश गायकवाड सर्व रा.नाशिक यांनी आपला शारीरिक व मानसिक छळ केला असल्याबाबत फिर्यादी महिला (वय-२१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला हिचे लग्न,पंचवटी नाशिक येथील तरूण कृष्णा खांडे याचे बरोबर दि.२१ मे २०१९ रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या पंधरा दिवसात दाखविण्यास प्रारंभ केला असून माहेराहून चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी पैसे आणावे यासाठी छळ सुरु केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील विवेकानंद नगर बालाजी अंगण येथील माहेर असलेली फिर्यादी महिला हिचे लग्न हनुमानवाडी पंचवटी येथील तरुण कृष्णा खांडे याचे बरोबर दि.२१ मे २०१९ रोजी मोठ्या डामडौलात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या सासरच्या मंडळींनी आपले रंग अवघ्या काही महिन्यांत दाखविण्यास प्रारंभ केला व या नवविवाहित महिलेने आपल्या माहेराहून चार चाकी वाहन घेण्यासाठी ०५ लाख रुपये आणावे या साठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरु केला व तिला उपाशी पोटी ठेऊन शिवीगाळ सुरु करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला.

यात आरोपी नवरा कृष्णा प्रकाश खांडे,सासरा प्रकाश नानासाहेब खांडे,सासु मंदा प्रकाश खांडे,नणंद दीपाली किशोर सावंत,प्रियांका रवींद्र शिंदे,सायली गणेश गायकवाड  सर्व रा.नाशिक यांचा समावेश आहे.यात नवऱ्याने आपल्याशी अनैसर्गिक कृत्य केले व गर्भपात केला असल्याचा गंभीर आरोप फिर्यादी महिला(वय-२१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यात दि.१६ सप्टेंबर २०२० रोजी शेवटची घटना असून त्या दिवशी फिर्यादीला तिच्या वडिलांनी लग्नात दिलेले स्त्री धन अंगावरून हिसकावून घेऊन व अंगावरील कपड्यासह सासरहून हाकलून दिले आहे.तिने या प्रकरणी कोपरगाव तालुका शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा भा.द.वि.कलम ४९८(अ),४०६,३७७,३१२,३१३,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close