जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहर हद्दीतून दोन अल्पवयीन मुली गायब ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतून व कोपरगाव बेट येथून दोन अल्पवयीन मुली अनुक्रमे ०९ व दि.१४ ऑक्टोबरच्या दिवशी अज्ञात कोणातरी व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे फिर्याद मुलीच्या मातानीं व कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहर व तालुक्यात आठवड्यात एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,गेल्या साडेचार वर्षांत कोपरगाव शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे.यामध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून,या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे घराची बेइज्जती होईल या भीतीने मागेदेखील घेतले जातात.मात्र, यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी हद्दीतून व कोपरगाव बेट येथे अशाच घटना पाच दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत.असून यात फिर्यादी महिलेने या बाबत कोपरगाव तालुका शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपण व आपली मुलगी आपल्या परिवारासह दि.०९ ऑक्टोबरच्या रात्री सर्व नियत कर्म आटोपून झोपी गेलो असता रात्री दहा वाजेनंतर ते पहाटे ०३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीस फूस लावून पळवून नेले आहे.हि बाब त्यांना सकाळी झोपेतून जाग आल्यावर व उठल्यावर समजून आली.त्यांनी याबाबत तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत कोपरगाव बेट येथील एक व्यापारात गुंतलेल्या कुटूंबातील आई दुकानावर आल्यावर दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५ वाजता सदरची मुलगी घरून काहीही न सांगता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे.दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेटी दिल्या आहेत.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.३१२/२०२१ व ३१३/२०२१ भा.द.वि.कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे अनुक्रमे करत आहेत.या घटनांनी कोपरगाव शहर व तालुका हादरून गेला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close