जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ते अवैध कत्तल खाणे बंद करा-निर्वाणीचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील कसाई समाजातील नागरिकांना आपला व्यवसाय करण्यासाठी आपण मनाई वस्ती येथील नगरपरिषद हद्दीतील कत्तलखाण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करून दिल्या असतानाही काही नागरिक कोपरगाव पालिका प्रशासनाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे आता ते सहनशीलतेचा पलीकडे गेले आहे.त्यामुळे त्यांनी संजयनगर येथील अवैथ कत्तल खाणे त्वरित बंद करावे असा निर्वाणीचा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

“संवत्सर येथील मनाई येथील म्हैसवर्गीय जनावरांच्या कत्तलखाण्याचा नियमितपणे वापर करा.तेथे अजून काही आवश्यक सुविधा पाहिजे असतील तर त्याही करून देण्यात येतील.पण कुठल्याही परिस्थितीत गोवंशहत्या सहन केली जाणार नाही.या निमित्ताने काहीजण अर्धवट माहितीवर सामाजिक संकेतस्थळावर संदेश टाकून आपल्याबाबत बद्दल गरळ ओकत आहेत हे चुकीचे आहे”-विजय वहाडणे, नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत संजयनगर परिसरात वारंवार अवैध कत्तल खाणे सुरु असल्याचे सिद्ध होत असून त्या ठिकाणी गोवंश कत्तल होत आहे.व ते रक्त मिश्रित पाणी पवित्र गोदावरी नदीत जात असून त्या बाबत शहरातील हिंदू संघटनांनी नुकताच कोपरगाव नगरपरिषदेवर व शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता.त्यात नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी जबाबदारीचे खापर एकमेकावर फोडले होते.त्याचे पडसाद उमटले असून कोपरगाव नगर परिषरिदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नुकतीच या समाजाच्या शिष्टमंडळाची नरपालिकेत बैठक घेऊन त्यांना याबाबत कडक समज दिली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील कत्तलखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळविण्यासाठी आपण स्वतः कसाई-कुरेशी समाजाचे शिष्टमंडळासह नगर कार्यालयात गेलो होतो.व प्रयत्नपूर्वक मान्यताही मिळविली.सुमारे एक कोटी रूपये खर्च करून बांधून पडलेला कत्तलखाना हा दुरुस्त करून घेतला.त्यातील मशिनरी सुरू करून घेतल्या आहेत.त्याची रंगरंगोटी-स्वच्छता करून फक्त म्हैसवर्गीय जनावरासाठी कत्तलखाना सुरु सुरू करून दिला आहे.सर्वच नगरसेवकांच्या संमतीने संजयनगर भागात त्यांना मटन विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली.पण गोवंश हत्याबंदी असतांनाही बहुतांश कसाई मात्र संजयनगर परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशहत्या करून संपुर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.त्यांना कायद्याशी व हिंदू समाजाच्या भावनांशी काहीच देणेघेणे नाही असे दिसून येत आहे.

आपण नगराध्यक्ष झाल्यापासून केलेल्या कामांची पुस्तिका लवकरच प्रसिद्ध करणार आहे.पुस्तिका वाचल्यानंतर भंपकपणे बोलणारे अर्धवटराव नक्कीच शांत होतील.आपण कुणाचाही धर्म-पक्ष पाहून कारभार केलेला नसून शहराच्या हितासाठीच काम केलेले आहे.
त्यासाठी त्यांनी संत ज्ञानेश्वर संकुलातील तळ मजल्यात व्यवसाय करणाऱ्या बांगडी व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावरून दिसतच नसल्याने त्यांचा धंदाच होत नव्हता.त्यांना पायऱ्या बांधण्याची परवानगी देऊन त्यांची अनेक वर्षांची अडचण दुर करण्यात आली.सार्वजनिक काम करत असताना आपण कुठलाही भेदभाव करत नाही हे उघड आहे.भेदभाव करत असेल असे काहींना वाटत असेल तर त्यांनी तीनही मुस्लिम नगरसेवकांशी बोलून खात्री करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

भेदभाव करायचा नाही व कुणाचे फालतू लाडही करणार नाही हे चुकीचे-बेकायदा काम करणाऱ्यानी लक्षात घेणे सर्वांच्याच हिताचे होईल. शहरातील सर्वसामान्य कष्टकरी हिंदु-मुस्लिम समाजात सलोखा आहे.पण कुणी गोहत्या करून भावना दुखविणार असतील तर अशा तालिबानीबद्दल ज्यांना कळवळा असेल त्यांनी आता भानावर येण्याची गरज आहे. असा इशारा दिला आहे.यापूर्वी कोपरगाव शहरात दिवंगत हबीबभाई मणियार,करीमभाई कुरेशी आदींनी शहरात धार्मिक सलोखा राहिल असेच कार्य केले.आताच्या अर्धवटरावांनी इतिहास समजून घेतला तर सर्वांच्याच हिताचे होईल असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close