जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील सुमारे २७ कि. मी.अंतरावरील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नगदवाडी या ठिकाणी काही कामासाठी गेलेले दुचाकी स्वार दत्तू रायभान गडाख (वय-३२) रा.पारेगाव ता.संगमनेर यांची ३० हजार रुपये किमतीची व काळ्या रंगाची व लाल पट्टा असलेली हिरो होंडा ड्रीम युगा हि दुचाकी (क्रं.एम.एच.१७ डी.जे.४६५७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.त्यामुळे तालुक्यातील दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आपण सोनेवाडी नजीक असलेल्या नगदवाडी हद्दीत आपल्या काही खाजगी कामासाठी दि.१८ ऑगष्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेलो असता त्या ठिकाणी आपली वरील क्रमांकाची दुचाकी लावून एका ठिकाणी गेलो असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे.

या प्रकरणी फिर्यादी दत्तू गडाख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण सोनेवाडी नजीक असलेल्या नगदवाडी हद्दीत आपल्या काही खाजगी कामासाठी दि.१८ ऑगष्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेलो असता त्या ठिकाणी आपली वरील क्रमांकाची दुचाकी लावून एका ठिकाणी गेलो असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु..र.क्रं.३०७/२०२१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close