जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

खिडकीची दुरुस्ती केल्याने ट्रॅक्टरची तोडफोड,कोपरगावात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या फिर्यादी महिला हि व तिची मुलगी नुकतीच घरासमोर बसलेली असताना त्याच गावातील आरोपी विशाल अनिल जाधव,जितेश अनिल जाधव सह आठ जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन,”कोर्टात दाखल असलेल्या शेत वाटपाच्या कारणावरून व “तू आम्हाला न विचारता खिडकीचे दुरुस्तीचे काम केले”असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून यातील आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव यांनी वाईट नजरेने बघून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले असल्याची फिर्याद प्रमिला जॉन जाधव (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सुरेगाव येथील आठ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन “कोर्टात दाखल असलेल्या शेत वाटपाच्या कारणावरून व “तू आम्हाला न विचारता खिडकीचे दुरुस्तीचे काम का केले”असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले तर यातील आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव यांनी त्यांचेकडे वाईट नजरेने बघून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचा गुन्हा कोपरगावात दाखल झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच गावातील रहिवाशी असून एकमेकांचे नातेवाईक आहे.त्यांचे शेत एकमेकांजवळ आहे.त्यांचा काही शेतजमिनीचा वाद सुरु असून त्याचा अद्याप निवाडा झालेला नाही.त्याबाबत वाद हा कोपरगाव येथील न्यायालयात सुरु आहे.दरम्यान फिर्यादी महिला व तिची मुलगी हि.दि.बुधवार दि.७ जुलै रोजी रात्री अकरा वाजता आपल्या घरासमोर बसलेल्या असतांना आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव,अनोख अनिल जाधव,पुष्पा अनिल जाधव,सोनम अनोखा जाधव,पिंकी जितेश जाधव,रिंकी विशाल जाधव,अनिल देवानंद जाधव आदी आठ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन “कोर्टात दाखल असलेल्या शेत वाटपाच्या कारणावरून व “तू आम्हाला न विचारता खिडकीचे दुरुस्तीचे काम का केले”असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले तर यातील आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव यांनी त्यांचेकडे वाईट नजरेने बघून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद प्रमिला जॉन जाधव (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७१/२०२१ भा.द.वी. कलम ५०९,१४३,१४७,१४९,५०४,५०६,४२७ प्रमाणे वरील आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close