जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोदावरी नदीत नवविवाहित तरुणीचे प्रेत,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद,सासरच्यांवर संशय !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत शिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या व कोळगाव पाटी येथील माहेर असलेल्या तरुणी राणी किरण चंदनशिव (वय-१९) हे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास शव पाण्यात तरंगताना आढळून आल्याने धारणगाव शिवारात खळबळ उडाली आहे.दरम्यान हि घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून कोपरगाव तालुका पोलिसानी सदर महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतले असून सासरचे सासू,सासरे,नवरा,दीर,भाया आदींना ताब्यात घेतले आहे.चौकशीतून हि हत्या की आत्महत्या यावर प्रकाशझोत पडणार आहे.

नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळीस पैशाचा हव्यास सुटल्याने हि घटना घडली असल्याची चर्चा आहे.सदर तरुणाने आपल्या बायकोला भ्रमणध्वनीवर पाठवलेला संदेश हाती लागला असून त्यात,”मी,तुझ्या शिवाय जगू शकत नाही” असा संदेश मिळाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यास पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राणी चंदनशिव या तरुणीचे लग्न दोन महिन्यांपूर्वी दि.२२ एप्रिल रोजी धारणगाव येथील तरुण किरण चंदनशिव याचे बरोबर कोरोना काळात निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते.सदर तरुण हा नाशिक जिल्ह्यातील बजाज फायनास या खाजगी कंपनीत नोकरी करत असून त्यास नाशिक येथे राहण्यासाठी घर घेण्याची इच्छा होती.त्यातून त्याने आपल्या पत्नीला आपल्या माहेराहून पन्नास हजार रुपये आणावे या साठी दबाव आणला होता.यातून हि घटना घडल्याची माहिती धारणगाव परिसरातील नागरिकांत चर्चिली जात आहे.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळीस पैशाचा हव्यास सुटल्याने हि घटना घडली असल्याची चर्चा आहे.सदर तरुणाने आपल्या बायकोला भ्रमणध्वनीवर पाठवलेला संदेश हाती लागला असून त्यात,”मी,तुझ्या शिवाय जगू शकत नाही” असा संदेश मिळाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यास पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे.हा तपासणी अहवाल आल्यावर हा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.माहेरची मंडळी अद्याप कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोहचली नव्हती ते आल्यावर काय भूमिका घेतात यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात क्रं.-२६/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.महेश कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close