शैक्षणिक
गौतम तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी शासनाच्या वतीने प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा–या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.प्रवेशासाठी आवश्यक असणा–या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे.
गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सुविधा यामध्ये अतिजलद इंटरनेट सुविधा नव्यानेच उभारण्यात आलेली आहे.सर्व सोयींनीयुक्त अशी कार्यशाळा सर्व प्रकारची साधन सामुग्री या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा–या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.प्रवेशासाठी आवश्यक असणा–या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे.या केंद्रातून प्राध्यापक अमोल गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था व शाखा निवड,विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे–या व प्रवेश घेवू इच्छिणा–या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळणार असल्याचे प्राचार्य सुभाष भारती यांनी सांगितले आहे.