गुन्हे विषयक
कोंबडा मुलाच्या पाठीमागे पळाल्याच्या कारणावरून कोपरगावात दोन आरोपींवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या देशात भांडण कोणत्या कारणावरून होईल हे काही सांगता येत नाही अलीकडील भांडणे अगदी किरकोळ कारणावरून होत असून त्यातून माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात अशीच घटना कोपरगाव तालुक्यात सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत घडली असून फिर्यादी महिला प्रतीक्षा जालिंदर पांगारकर यांचा कोंबडा आरोपींच्या मुलाचे मागे पळाला या किरकोळ कारणावरून आरोपी भाऊराव चंद्रभान सोनवणे व राणी भाऊराव सोनवणे यांनीं आपल्याला व आपल्या भावाला वीट व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे या विचित्र भांडणाची चर्चा तालुकाभर पाहावयास मिळाली आहे.
फिर्यादी महिलेकडे काही गावरान जातीच्या कोंबड्या आहेत.त्यातील एक नर जातीचा कोंबडा हा दि.२४ जून रोजी.दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास आरोपी भाऊराव सोनवणे व राणी सोनवणे यांच्या मुलाच्या मागे लागला याचा राग मनात धरून आरोपी सोनवणे पती पत्नीने फिर्यादीस व तीच्या भावास विट व काठीने मारहाण करून जखमी केले आहे.व याबाबत तसा विचित्र गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच गावात व गल्लीत राहातात.फिर्यादी महिलेकडे काही गावरान जातीच्या कोंबड्या आहेत.त्यातील एक नर जातीचा कोंबडा हा दि.२४ जून रोजी.दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास आरोपी भाऊराव सोनवणे व राणी सोनवणे यांच्या मुलाच्या मागे लागला याचा राग मनात धरून आरोपी सोनवणे पती पत्नीने फिर्यादीस व तीच्या भावास विट व काठीने मारहाण करून जखमी केले आहे.व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला प्रतीक्षा पांगारकर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे हा दुसरी घटना असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.
कोपरगाव तालुका पोळसांनी या प्रकरणी आरोपी सोनवणे यांचे विरुद्ध गु.र.क्रं.२३१/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी भाऊराव सोनवणे व राणी सोनवणे या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.