जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीची धडक,कोपरगाव तालुक्यात महिला ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत शनी चौकात वेळापुरकडे जाणाऱ्या वाहनांची वाट पाहात थांबलेल्या महिला मुक्ताबाई खंडू वाघ (वय-६०) यांना अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन तो फरार झाला आहे.त्यात हि महिला जखमी होऊन लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे दि.१९ जूनच्या पहाटे १.१५ वाजेच्या सुमारास निधन झाले आहे या प्रकरणी मयत महिलेची सुरेगाव येथील मुलगी व फिर्यादी सुनीता मेघनाथ सोनवणे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयत महिला मुक्ताबाई वाघ या दि.१० जून रोजी सुरेंगावहून वेळापुरकडे जाण्यासाठी निघाल्या असता शनी चौकात वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी थाम्बल्या असता त्यांना अज्ञात दुचाकी वरील स्वाराने धडक देऊन कोणतीही माहिती न देता फरार झाला आहे.त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि सुरेगाव येथील रहिवाशी असून त्यांची आई मयत महिला मुक्ताबाई वाघ या दि.१० जून रोजी सुरेंगावहून वेळापुरकडे जाण्यासाठी निघाल्या असता शनी चौकात वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी थाम्बल्या असता त्यांना अज्ञात दुचाकी वरील स्वाराने धडक देऊन कोणतीही माहिती न देता फरार झाला आहे.त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ लोणी येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यात त्यांचे दि.१९ जून रोजी निधन झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यू दप्तर नोंदणी पुस्तकात अकस्मात मृत्यू क्रं.२४/२०२१ अन्वये नोंद केली होती.या प्रकरणी मयत महिलेची मुलगी व फिर्यादी सुनीता सोनवणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दुचाकी स्वाराच्या विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२३२/२०२१ भा.द.वि.कलम ३०४,(अ) २७९,३३८,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,अ.ब, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close