जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात कार-दुचाकी अपघात दोन जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवात्सर ग्रामपंचायत हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ दि.२३ जून रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास मारुती स्विफ्ट कारने (क्रं.एम.एच.२० बी.सी.४४८८) हिने बजाज एम-८० (क्रं.एम.एच.१७ ई.३५४३) हिला जोराची धडक देऊन दुचाकीवरील इसम चंद्रकांत भिमाजी वैद्य,(वय-५१)व संगीता चंद्रकांत वैद्य (वय-४५) दोघे रा.धोत्रे ता.कोपरगाव यांना जखमी करून त्यावरील चालक कुठलीही सूचना न देता फरार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वरील स्विफ्ट कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीचे आई आणि वडील हे कोपरगाव कडून धोत्रे या गावी दुचाकी वरून दि.२३ जून रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास जात असताना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील कार हयगईने चालवून त्याना जोराची धडक दिली आहे.त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.व दोन्ही वाहनाचे नुकसानींस कारणीभूत झाला आहे व घटना स्थळावरून फरार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,याबाबत फिर्यादी प्रशांत चंद्रकांत वैद्य (वय-२५) रा.धोत्रे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दखल केला आहे.व त्यात त्यांनी म्हटले आहे की.वरील क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट कार वरील अज्ञात चालकाने आपल्या आई आणि वडील हे कोपरगाव कडून धोत्रे या गावी दुचाकी वरून दि.२३ जून रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास जात असताना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील कार हयगईने चालवून त्याना जोराची धडक दिली आहे.त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.व दोन्ही वाहनाचे नुकसानींस कारणीभूत झाला आहे.त्यानां नजीकच्या ग्रामस्थांनी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात भरती केले असून त्त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे.याबाबत स्विफ्ट चालकाने कुठलीही खबर न देता फरार झाला झाला आहे.या प्रकरणी जखमीच्या मुलाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९७/२०२१ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१८५,१३४,(अ)(ब) १७७ प्रमाणे अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close