निवडणूक
…या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन

न्यूजसेवा
नाशिक-(प्रतिनिधी)
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक२०२४ करिता सर्व मतदारांनी २६ जून रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजे पर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ ची निवेडणूक अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीत माघारीनंतर एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत.यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे,शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.संदीप गुळवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह अपक्ष उमेदवार भागवतराव गायकवाड आदी २१उमेदवार असले तरी अपक्ष उमेदवार भागवत गायकवाड व विवेक कोल्हे यांनी आपल्या विजयाचा दावा केला असल्याची माहिती आहे.
या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही श्री.सागर यांनी कळविले आहे.