गुन्हे विषयक
कडी,कुलूप तोडून ८० हजारांची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात रावंदे ग्रामपंचायत हद्दीत सताळी रोड वर असलेल्या थोरात वस्तीवर रात्री दहा वाजे नंतर घरचे माणसे झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व घरातील घरातील ३० हजार रुपये कींमतीचे तींन तोळे वजनाचे दागिने,पन्नास हजरांची रोख रक्कम,एक मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची फिर्याद तेथील शेतकरी शिवाजी नामदेव थोरात (वय-७४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हे घरात झोपी गेले असता चोरट्यानी घरातील ३० हजार रुपये किमतीचे तींन तोळे वजनाचे दागिने,त्यात दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र,पोत, एक तोळा वजनाचे कर्णफुल, अंगठी,लक्ष्मी,गणपतीचे चित्र असलेले सोन्याचे नाणे तीन ग्रॅम वजनाचे असे एकूण तीस हजरांचे दागिने,व ५० हजारांची रोख रक्कम त्यात ५००,२००,१०० रुपये किमतीच्या नोटा एक जपानी कंपनीचे मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोरोनाचा कहर सुरु असून अनेकांचा रोजगार हिरावला गेला असल्याने अनेक जण वाळूचोरी.चोऱ्या-माऱ्या या व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात तापमान जास्त असल्याने ग्रामस्थ घराला कुलूप लावून घराबाहेर झोपत आहे. घरातील माणसें झोपी गेल्यावर पाळतीवर असलेले चोरटे आपला डाव साधत असल्याने दिसून येत आहे.अशीच घटना रवंदे ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.तेथील रहिवाशी असलेले फिर्यादी शिवाजी थोरात हे आपल्या कुटुंबियासंवेत सताळी रोडनजीक गावापासून काही अंतरावर राहतात. ते आपले दैनंदिन शेतीवाडीचे कामकाज अटोपुन रात्री दहा वाजेच्या सुमारास झोपी गेले असता व पहाटे साडेचार वाजता आपल्या कामासाठी उठले असता त्यांना आपले घर उघडे दिसले त्यावेळी त्यांना संशय आला असता त्यांनी घरात जाऊन पहिले असता घराचे कुलूप तोडून घरातील त्यांच्या सामानाची उचक-पाचक केलेली आढळून आली आहे.व घरातील सोन्याचे दागिने लंपास झालेले आढळून आले आहे.त्यात घरातील ३० हजार रुपये किमतीचे तींन तोळे वजनाचे दागिने,त्यात दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र,पोत, एक तोळा वजनाचे कर्णफुल, अंगठी,लक्ष्मी,गणपतीचे चित्र असलेले सोन्याचे नाणे तीन ग्रॅम वजनाचे असे एकूण तीस हजरांचे दागिने,व ५० हजारांची रोख रक्कम त्यात ५००,२००,१०० रुपये किमतीच्या नोटा एक जपानी कंपनीचे मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची फिर्याद तेथील शेतकरी शिवाजी नामदेव थोरात (वय-७४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र,क्रं.२१८/२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हड दाखल केला आहे.दरम्यान या घटनेने रवंदे शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून अज्ञात चोरट्यांचा तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.