जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बांधावरील झुडपे काढण्यावरून हाणामारी,कोपरगावात चौघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी यांनी आरोपी गणपत गंगाधर गागरे,गंगाधर चांगदेव गागरे,माया गणपत गागरे,कांताबाई गंगाधर गागरे यांना,” शेताच्या सामायिक बांधावरील झुडपे काढून घ्या त्यामुळे असावा पडतो”असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी गणपत गागरे याने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला व गंगाधर गागरे याने डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारी असलेल्या बोटास चावा घेऊन जखमी करून आपल्याला व आपल्या पत्नीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचा गुन्हा फिर्यादी भाऊसाहेब त्र्यंबक पाडेकर (वय-५२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने धोत्रे परिसरात खळबळ उडाली आहे.

धोत्रे येथील फिर्यादी भाऊसाहेब पाडेकर यांनी आरोपी गणपत गंगाधर गागरे,गंगाधर चांगदेव गागरे,माया गणपत गागरे,कांताबाई गंगाधर गागरे यांना,”शेताच्या सामायिक बांधावरील झुडपे काढून घ्या त्यामुळे असावा पडतो”असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी गणपत गागरे याने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला व गंगाधर गागरे याने डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारी असलेल्या बोटास चावा घेऊन जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी भाऊसाहेब पाडेकर व आरोपी गणपत गागरे यांचे शेत एकमेकांच्या शेजारी-शेजारी आहे.वर्तमानात शेतकऱ्यांची पावसाची शक्यता वाढल्याने खरीप पिकांची पूर्व मशागत करण्याची घाई सुरू असून त्या साठी फिर्यादी व आरोपी हे दि.०६ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या धोत्रे शिवारातील शेतात गेले असता त्या ठिकाणी फिर्यादी पाडेकर यांनी आरोपी गणपत गंगाधर गागरे,गंगाधर चांगदेव गागरे,माया गणपत गागरे,कांताबाई गंगाधर गागरे यांना,”शेताच्या सामायिक बांधावरील झुडपे काढून घ्या त्यामुळे असावा पडतो”असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी गणपत गागरे याने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला व गंगाधर गागरे याने डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारी असलेल्या बोटास चावा घेऊन जखमी करून आपल्याला व आपल्या पत्नीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचा गुन्हा फिर्यादी भाऊसाहेब पाडेकर यांनी दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०४/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close