जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

उजव्या कालव्यात पडून एकाचा मृत्यू,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेला इसम भागीनाथ मारुती पवार (वय-६०) या इसमाचा गोदावरी उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाला असल्याची खबर नारायण भागीनाथ पवार (वय-३०) रा.नउचारी पंचकेश्वर रोड पोहेगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे सोनेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

त्यानी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.२७ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निश्चित वेळ माहित नाही.सोनेवाडी हद्दीत तुळशीराम जावळे यांचे घरासमोर गोदावरी उजव्या कालव्याच्या पाण्यात हि दुर्घटना घडली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी दप्तर क्रं.१९/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close