गुन्हे विषयक
आत्महत्येस प्रवृत्त केले,शिर्डीत नवरा,सासू,सासऱ्यांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सासरच्या मंडळींनी आपल्याला चारचाकी वाहन खरेदी करावयाचे असून त्यासाठी आपल्या माहेराहून एक लाख रुपयांची रक्कम आणावी या साठी डोऱ्हाळे येथील विवाहिता रोहिणी इंद्रभान सरोदे हीचा शारीरिक,मानसिक त्रास देऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला तिचा डोऱ्हाळे येथील नवरा इंद्रभान अशोक सरोदे,सासरा अशोक चंद्रभान सरोदे,सासू सिंधुबाई अशोक सरोदे यांनी आत्महत्या करावयास भाग पडल्याचा गुन्हा फिर्यादी पिता भगवान रामराव चव्हाण (वय-५५) रा.धोत्रे ता.कोपरगाव यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात काल दाखल केला आहे.त्यामुळे राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सासरच्या मंडळींनी मागील दोन महिन्यापासून चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे असा तगादा सुरु केला होता.व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ करून तिला मारहाण,शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे तिने होणाऱ्या मारहाणीच्या व छळास कंटाळून तिने छताच्या कडीला दोरी अटकावून गळफास घेतला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मयत मुलीचे पिता भगवान चव्हाण यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपली मुलगी रोहिणी चव्हाण हिचे लग्न राहाता तालुक्यातील इंद्रभान सरोदे यांचेशी काही वर्षांपूर्वी मोठ्या डामडौलात लावून दिले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी तिला तिने माहेराहून दोन लाख रुपये आणावे अशी मागणी सुरु केली.ती आपण पुरवून त्यांना ती रक्कम दिली होती.त्या नंतर त्यांनी मागील दोन महिन्यापासून चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे असा तगादा सुरु केला होता.व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ करून तिला मारहाण,शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे तिने होणाऱ्या मारहाणीच्या व छळास कंटाळून दि.२८ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराच्या लाकडी छताला असलेल्या लोखंडी कडीला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तिला वरील आरोपीनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.असे म्हणून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस कोविड तपासणी करून अटकेची कारवाई करत आहे.
शिर्डी पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९०/२०२१ भा.द.वि.कलम ३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील नवरा,सासरे,सासू आदी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले हे करीत आहेत.