जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जमीन खरेदी करून देण्यासाठी मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट.क्रं.१७०/०१ मध्ये फिर्यादी हे आपल्या शेताची नांगरट करत असताना आरोपी इसम भगवान चांगदेव गव्हाळे,कुंडलिक भगवान गव्हाळे,जगन रामनाथ गवारे,स्वाती पुंडलीक ढवळे,कांताबाई भगवान गव्हाळे आदींनी आपल्या शेतात गैरकायदायाची मंडळी जमवून आपल्याला घटनास्थळी येवुन,”तू माझी शेती आम्हाला कायमस्वरूपी खरेदी करून दे”असे म्हणून आपल्याला मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद शिवनाथ सोपान खिलारी (वय-४४)यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आपेगाव येथील आरोपी भगवान चांगदेव गव्हाळे सह पाच जणांनी आपल्या शेतात गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घटनास्थळी येवुन,”तू माझी शेती आम्हाला कायमस्वरूपी खरेदी करून दे”असे म्हणून आपल्याला मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आपेगाव येथील फिर्यादी शिवनाथ खिलारी हे आपल्या शेतात दि.२५ मेच्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पावसाळा जवळ आल्याने हंगामपूर्व नांगरटीची मशागत करत होते.त्या वेळी आरोपी भगवान चांगदेव गव्हाळे,कुंडलिक भगवान गव्हाळे,जगन रामनाथ गवारे,स्वाती पुंडलीक ढवळे,कांताबाई भगवान गव्हाळे आदींनी आपल्या शेतात गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घटनास्थळी येवुन,”तू माझी शेती आम्हाला कायमस्वरूपी खरेदी करून दे”असे म्हणून आपल्याला मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आपण खूप घाबरुन गेलो असून आपण या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे धाव घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१७९/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,१४३,१४७,१४८,१४९,४२७,३२३,५०४,५०६,प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close