जाहिरात-9423439946
आरोग्य

रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण रुग्णसेवेला बळकटी मिळणार-आधार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अ,नगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निधितून तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला निश्चितपणे बळकटी मिळणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

“वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेची कोपरगावच्या ग्रामीण भागात मोठी उणीव होती.त्यामुळे ग्रामीण रुग्णांना मोठी किंमत मोजावी लागत होती हि उणीव दूर करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा रुग्णांना नक्कीच उपयोग होईल”-आ.आशुतोष काळे.

रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात.काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते.आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. या कारणासाठी, त्यात सामान्यत: फ्लॅशिंग चेतावणी दिवे आणि सायरनसह लावलेले असतात. ते दृश्यासाठी पॅरामेडिक्स आणि इतर प्रथम प्रतिसादकर्ते द्रुतपणे वाहतूक करू शकतात.या सेवेची कोपरगावच्या ग्रामीण भागात मोठी उणीव होती.त्यामुळे ग्रामीण रुग्णांना मोठी किंमत मोजावी लागत होती हि उणीव दूर करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आ.काळे यांनी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केला असून त्याचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात करण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,अनिल कदम,श्रावण आसने,कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,नगरसेवक मंदार पहाडे,अजीज शेख,मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,नारायण लांडगे, डॉ.चंद्रशेखर आव्हाड,राहुल रोहमारे,राहुल जगधने,सुधाकर होन,डॉ.वैशाली बडदे,डॉ.दीपक पगारे,डॉ.राजेंद्र रोकडे,डॉ.कुणाल घायतडकर,डॉ.विलास घोलप,डॉ.नितीन बडदे,डॉ.शरद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला होता.मोठ्याप्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे वेळप्रसंगी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना रुग्णवाहिकेची अडचण येत होती हि अडचण दूर करण्यासाठी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली होती.कोपरगाव तालुक्यासाठी रुग्णवाहिका मिळाव्या यासाठी पाठपुरावा सुरु होता.या पाठपुराव्याला यश मिळून आज जिल्हा परिषदेकडून टाकळी,दहेगाव बोलका व पोहेगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १५ लाखाच्या तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहे . या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होऊन रुग्णांना बसणारी आर्थिक झळ कमी होणार आहे.कोपरगाव तालुक्याला रुग्णवाहिका दिल्याबद्दल आ. काळे यांनी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close