जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दुचाकीसह संगणकाची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील कापड बाजारात रहिवाशी असलेले फिर्यादी नंदकुमार त्रिंबक जोशी (वय-७०) यांच्या राहत्या घरातुंन पाठीमागील बोळीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये किमतीचे दोन संगणक संच,मॉनिटर,सी.पी.यू.व ०८ हजार रुपये किमतीची टी.व्ही.एस.स्टार कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ यू.५१५०) चोरून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने दुचाकी स्वारात खळबळ उडाली आहे.

सरकारने नुकतीच पंधरा दिवसासाठी टाळेबंदी जाहीर केली आहे.त्यामुळे शहरातील बहुतांशी दुकाने बंद राहात आहे.अनेक हातांचे रोजगार हिरावले गेले आहे.अशातच काही चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच कापड बाजारात घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीने कहर उडवला आहे.अनेकांना आपले प्राण द्यावेत लागले आहे.अनेक जण बाधित होत आहे सरकारने नुकतीच पंधरा दिवसासाठी टाळेबंदी जाहीर केली आहे.त्यामुळे शहरातील बहुतांशी दुकाने बंद राहात आहे.अनेक हातांचे रोजगार हिरावले गेले आहे.अशातच काही चोरट्यानी आपली हात की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच कापड बाजारात घडली असून फिर्यादी नंदकुमार जोशी हे दि.०९ एप्रिल रोजी आपल्या घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेऊन मागील गल्लीतून त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे दोन संगणक संच,मॉनिटर,सी.पी.यू.व ०८ हजार रुपये किमतीची टी.व्ही.एस.स्टार कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ यू.५१५०) चोरून नेली असल्याचे त्यांच्या सकाळी निदर्शनात आले आहे.त्यांनी याबाबत काल उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.११७/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close