कोपरगाव तालुका
कोपरगावात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून महिलेला मदत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील श्रीमती रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा २० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.२० हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येते.अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय,तहसलिदार संजय गांधी योजना,तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील रहिवासी असलेले राजेंद्र शिलेदार यांचे मागील वर्षी निधन झाले होते.मयत राजेंद्र शिलेदार हे त्यांच्या कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते.उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे श्रीमती शिलेदार यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला होता.त्यांचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्यामुळे श्रीमती रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांनी सामाजिक अर्थ सहाय्य योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्ज केला होता.त्याबाबत श्रीमती शिलेदार यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून श्रीमती शिलेदार यांना २० हजारांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती.या मदतीचा धनादेश नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे.पतीच्या निधनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटात आ. काळे यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या मदतीतून आर्थिक अडचण दूर होणार असल्यामुळे श्रीमती रत्नमाला शिलेदार यांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.
सदर प्रसंगी आ.काळे यांनी श्रीमती रत्नमाला शिलेदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.या वेळी संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून श्रीमती एस. टी.गोंदके,केशव विघे आदी मान्यवर उपस्थित होते.